हिप्परगा केंद्रात वैभवी भोसले प्रथम; दिलीपराव माने कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावी निकाल 62.85 टक्के

प्रतिनिधी-होनसळ 
येथील दिलीपराव माने कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता 12 वी फेब्रुवारी 2026 परीक्षेचा निकाल 62.85 टक्के लागला असून महाविद्यालयातील विद्यार्थिनी वैभवी भोसले हिने 80.50 टक्के गुण मिळवून हिप्परगा केंद्रात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तसेच प्रशालेतूनही ती प्रथम आली आहे.
याशिवाय श्रेया हेंद्रे हिने 72.17 टक्के गुण मिळवून केंद्रात द्वितीय क्रमांक मिळवला, तर श्रुती जाधव हिने 67.50 टक्के गुणांसह प्रशालेत तृतीय क्रमांक मिळवला.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष संभाजी भडकुंबे, माजी सभापती रजनीताई भडकुंबे, उपाध्यक्ष अभिजीत भडकुंबे, सचिव विकास बनसोडे, सहसचिव अमित भडकुंबे तसेच प्राचार्य राजेंद्र मोहोळकर यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Comments

Popular posts from this blog

करजगी येथे श्री १०८ ष.ब्र.शिव सोमनाथ शिवाचार्य महास्वामीजी संस्थान हिरेमठ संस्थान मठाच्या मठाधिपतींचा भव्य पट्टाधिकार व पट्टाभिषेक सोहळा उत्साहात संपन्न.

संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त आपदा मित्र-सखींकडून स्वच्छता मोहीम

दुधनीतील बौध्द समाजांनी जे कामे सुचवतील त्या कामांना प्राधान्य देणार-अप्पु परमशेट्टी.