Posts

निशब्द झाली सोलापूर जिल्हा परिषद... अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू; स्व. अजितदादा पवार यांना श्रद्धांजली.

Image
प्रतिनिधी - सोलापूर  सोलापूर जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आज हुतात्मा दिनानिमित्त तसेच स्वर्गीय स्व. अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करताना वातावरण भावूक झाले.  अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळत होते आणि संपूर्ण सभागृह निःशब्द झाले होते.जिल्हा परिषदेत आयोजित शोकसभेत अधिकारी-कर्मचारी हळहळ व्यक्त करत स्व. अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. प्रारंभी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या हस्ते स्व. अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर उपस्थितांनी दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली वाहिली. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मिनाक्षी वाकडे, बांधकाम कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले, अतिरिक्त मुख्य लेखा व वित्त अधिकारी शशीकिरण उबाळे, योजना शिक्षणाधिकारी सुलभा वठारे, प्रशासन अधिकारी अविनाश गोडसे, अधिक्षक गिरीष जाधव यांच्यासह मोठ्य...

जिल्हा परिषद सोलापूर येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा सीईओ कुलदीप जंगम यांच्या हस्ते ध्वजवंदन

Image
प्रतिनिधी -सोलापूर  सोलापूर जिल्हा परिषदेत भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) कुलदीप जंगम यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करून ध्वजवंदन करण्यात आले. या कार्यक्रमास जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक चंद्रकांत जगताप, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मिनाक्षी वाकडे, सामान्य प्रशासन विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायती) सुर्यकांत भुजबळ, कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सचिन जगताप, शिक्षणाधिकारी कादर शेख, कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी, जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता सप्ताळे, गटविकास अधिकारी तसेच विविध विभागांचे प्रमुख अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. प्रारंभी हरीभाई देवकरण प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी राज्यगीत सादर केले. त्यानंतर जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी कुष्ठरोग न...

विश्व परिवर्तन फाउंडेशन व लेटेस्ट न्यूज चॅनलचा चौथा वर्धापन दिन; गुणीजनांचा भव्य गौरव सोहळा उत्साहात साजरा

Image
प्रतिनिधी – सोलापूर सामाजिक बांधिलकी जपत विश्व परिवर्तन फाउंडेशन व लेटेस्ट न्यूज चॅनल यांच्या संयुक्त विद्यमाने चॅनलच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणीजनांचा भव्य गौरव सोहळा आयोजित करण्यात आला. हा कार्यक्रम रविवार, दिनांक 18 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता, प्रगती लॉन्स, अंत्रोळीकर नगर, कुमठा नाका, सोलापूर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. रित्विक जयकर (डीन, सिव्हिल हॉस्पिटल), अॅड. रियाज शेख (उपाध्यक्ष, सोलापूर बार असोसिएशन), बापूसाहेब सदाफुले (अध्यक्ष, कामगार युनियन), अजय दासरी (जिल्हाध्यक्ष, शिवसेना ठाकरे गट), नसीमा पठाण (ज्येष्ठ साहित्यिका व प्राध्यापिका), इ.जा. तांबोळी (प्राचार्य, सोशल महाविद्यालय), शिवाजी शिंदे (सहाय्यक कुलसचिव, सोलापूर विद्यापीठ), विक्रम (बापू) खेलबुडे (अध्यक्ष, श्रमिक पत्रकार संघ सोलापूर), महबूब तांबोळी (प्रदेशाध्यक्ष, जनसेवा शिक्षक संघटना) व इरशाद शेख (आधारस्तंभ व मार्गदर्शक, विश्व परिवर्तन फाउंडेशन) यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या प्रारंभी फाउंडेशनचे अध्यक्ष व लेटेस्...

सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी तेराव्यांदा विक्रम (बापू) खेलबुडे यांची निवड.

Image
प्रतिनिधी – सोलापूर सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विक्रम (बापू) खेलबुडे यांची सलग तेराव्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यांच्यासोबत सरचिटणीसपदी सागर सुरवसे तर खजिनदारपदी किरण बनसोडे यांची फेरनिवड झाली.   विक्रम (बापू)खेलबुडे यांचीअध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पत्रकार राम हुंडारे व सिद्धार्थ भडकुंबे यांच्या वतीने बुके देऊन सत्कार करताना... रविवार,२१ सप्टेंबर रोजी संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा संघाच्या कार्यालयात पार पडली. अध्यक्षस्थानी विक्रम खेलबुडे होते. सभेत सरचिटणीस सागर सुरवसे यांनी मागील वर्षाचे इतिवृत्त मांडले व खजिनदार किरण बनसोडे यांनी वार्षिक जमा-खर्च अहवाल सादर केला. दोन्ही अहवाल सर्वानुमते मंजूर करण्यात आले. अध्यक्षपदासाठी किरण बनसोडे यांनी विक्रम खेलबुडे यांच्या नावाची सूचना केली, तर आप्पासाहेब पाटील यांनी अनुमोदन दिले. अशा प्रकारे खेलबुडे यांनी तेराव्यांदा अध्यक्षपदावर विराजमान होत विक्रम प्रस्थापित केला. या विश्वासास पात्र राहून काम करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ज्येष्ठ पत्रकार विजयकुमार देशपांडे व सहाय्यक अधिकारी अनिल ...

नाशिकमध्ये पत्रकारांवरील भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ पत्रकार कृती समितीतर्फे जाहीर निषेध.

Image
प्रतिनिधी-सोलापूर नाशिकमध्ये पत्रकार बांधवांवर झालेल्या भ्याड हल्ल्याने पत्रकार वर्तुळात संतापाची लाट उसळली आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळल्याने गुंडांना कायद्याचा धाक राहिलेला नाही, अशी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, सरकारकडून पत्रकारांच्या सन्मानाची पायमल्ली सातत्याने होत असल्याचा आरोपही करण्यात आला. दरम्यान, सोलापूर येथील चार हुतात्मा पुतळा येथे पत्रकार कृती समिती बहुउद्देशीय संस्था व पत्रकार बांधवांच्या वतीने काळ्या फिती लावून जाहीर निषेध नोंदविण्यात आला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध करण्यात आला. या घटनेचा जाहीर निषेध करताना पत्रकार कृती समिती बहुउद्देशीय संस्थेचे आप्पाश्री लंगोटे, सामाजिक कार्यकर्ते नाना प्रक्षाळे व ज्येष्ठ पत्रकार यशवंत पवार यांनी प्रतिक्रिया दिली. "पत्रकारांवरील हल्ले हे लोकशाहीला धोका आहे, अशा घटना निंदनीय असून सरकारने तातडीने कठोर कारवाई करावी," अशी मागणी त्यांनी केली.निषेध सभेला सैफन शेख, लतीफ नदाफ, नितीन करजोळे, गिरमल गुरव, अस्लम नदाफ, ज्येष्ठ पत्रकार इकबाल शेख, राम हुंडारे, सिद्धार्थ भडकुंबे, अकबर शेख, विजयकुम...