विश्व परिवर्तन फाउंडेशन व लेटेस्ट न्यूज चॅनलचा चौथा वर्धापन दिन; गुणीजनांचा भव्य गौरव सोहळा उत्साहात साजरा
प्रतिनिधी – सोलापूर
सामाजिक बांधिलकी जपत विश्व परिवर्तन फाउंडेशन व लेटेस्ट न्यूज चॅनल यांच्या संयुक्त विद्यमाने चॅनलच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणीजनांचा भव्य गौरव सोहळा आयोजित करण्यात आला. हा कार्यक्रम रविवार, दिनांक 18 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता, प्रगती लॉन्स, अंत्रोळीकर नगर, कुमठा नाका, सोलापूर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. रित्विक जयकर (डीन, सिव्हिल हॉस्पिटल), अॅड. रियाज शेख (उपाध्यक्ष, सोलापूर बार असोसिएशन), बापूसाहेब सदाफुले (अध्यक्ष, कामगार युनियन), अजय दासरी (जिल्हाध्यक्ष, शिवसेना ठाकरे गट), नसीमा पठाण (ज्येष्ठ साहित्यिका व प्राध्यापिका), इ.जा. तांबोळी (प्राचार्य, सोशल महाविद्यालय), शिवाजी शिंदे (सहाय्यक कुलसचिव, सोलापूर विद्यापीठ), विक्रम (बापू) खेलबुडे (अध्यक्ष, श्रमिक पत्रकार संघ सोलापूर), महबूब तांबोळी (प्रदेशाध्यक्ष, जनसेवा शिक्षक संघटना) व इरशाद शेख (आधारस्तंभ व मार्गदर्शक, विश्व परिवर्तन फाउंडेशन) यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या प्रारंभी फाउंडेशनचे अध्यक्ष व लेटेस्ट न्यूज चॅनलचे संपादक अशपाक शेख व मुजुमिल शेख यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. सर्व प्रमुख पाहुण्यांचा मानाचा फेटा, शाल, उपरणे व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.यानंतर मान्यवरांच्या हस्ते समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या गुणीजनांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, मानाचा फेटा व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
पुरस्कारार्थी खालीलप्रमाणे-
मोहन तालकोकुल – आदर्श मानव सेवा
सिद्राम वाघमोडे – आदर्श केंद्रप्रमुख
माळप्पा पुजारी – आदर्श सरपंच
सोहेल पटेल – आदर्श चेअरमन (सेंट्रल हॉस्पिटल, सोलापूर)
आसिफ शेख – आदर्श कम्प्युटर सेंटर (डायनामिक कम्प्युटर)
अब्दुल सत्तार शेख – आदर्श समाजसेवक
नूर अहमद कारंजे – आदर्श शिक्षक
रज्जाक मुजावर – आदर्श समाजसेवक
लाडजी नदाफ – आदर्श बहुउद्देशीय संस्था (हिदायत बहुउद्देशीय सामाजिक संघटना)
धीरजकुमार माने – आदर्श रुग्ण सेवा दूत (वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई)
अॅड. जयकुमार भंडारे – विधी गौरव
यूसुफ शेख – आदर्श शाळा (नॅशनल उर्दू हायस्कूल)
डॉ. केतकी जोशी – आदर्श डॉक्टर
खाजामीन काझी – आदर्श समाजसेवक
महेश धनवानी – आदर्श उद्योजक
बुऱ्हाण काझी – आदर्श निसर्गप्रेमी
रेशमा तलफदार – आदर्श परिचारिका व समाजसेविका यासह
विशेष सन्मान म्हणून अहमद कोतवाल, शकील नदाफ व सिद्धार्थ भडकुंबे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी मनोगत व्यक्त करत विश्व परिवर्तन फाउंडेशन व लेटेस्ट न्यूज चॅनलच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी मनोगत व्यक्त करत विश्व परिवर्तन फाउंडेशन व लेटेस्ट न्यूज चॅनलच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशपाक शेख व मुजुमिल शेख यांनी केले. सूत्रसंचालन सिद्धार्थ भडकुंबे यांनी केले, तर आभारप्रदर्शन नसीमा सेतसंधी यांनी केले.कार्यक्रमानंतर उपस्थित सर्व मान्यवर, पुरस्कृत व्यक्ती व नागरिकांसाठी अल्पोपहार व चहापानाची व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी इक्बाल शेख, सुमित गाडेकर, मुजम्मिल शेख, शकील नदाफ, रियाज पटेल, आदम बागवान, रफिक बागवान, इस्माईल शेख, दिलखुश तांबोळी, इम्रान लुंजे, अजमुद्दिन कोरबू, शाहिद शेख आदींनी विशेष परिश्रम घेतले.















Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240