नाशिकमध्ये पत्रकारांवरील भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ पत्रकार कृती समितीतर्फे जाहीर निषेध.

प्रतिनिधी-सोलापूर
नाशिकमध्ये पत्रकार बांधवांवर झालेल्या भ्याड हल्ल्याने पत्रकार वर्तुळात संतापाची लाट उसळली आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळल्याने गुंडांना कायद्याचा धाक राहिलेला नाही, अशी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, सरकारकडून पत्रकारांच्या सन्मानाची पायमल्ली सातत्याने होत असल्याचा आरोपही करण्यात आला.
दरम्यान, सोलापूर येथील चार हुतात्मा पुतळा येथे पत्रकार कृती समिती बहुउद्देशीय संस्था व पत्रकार बांधवांच्या वतीने काळ्या फिती लावून जाहीर निषेध नोंदविण्यात आला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध करण्यात आला.
या घटनेचा जाहीर निषेध करताना पत्रकार कृती समिती बहुउद्देशीय संस्थेचे आप्पाश्री लंगोटे, सामाजिक कार्यकर्ते नाना प्रक्षाळे व ज्येष्ठ पत्रकार यशवंत पवार यांनी प्रतिक्रिया दिली. "पत्रकारांवरील हल्ले हे लोकशाहीला धोका आहे, अशा घटना निंदनीय असून सरकारने तातडीने कठोर कारवाई करावी," अशी मागणी त्यांनी केली.निषेध सभेला सैफन शेख, लतीफ नदाफ, नितीन करजोळे, गिरमल गुरव, अस्लम नदाफ, ज्येष्ठ पत्रकार इकबाल शेख, राम हुंडारे, सिद्धार्थ भडकुंबे, अकबर शेख, विजयकुमार उघडे, सुरज राजपूत, नितीन कांबळे, अक्षय बबालाद, अमोल कुलकर्णी, बापूतांज पाटील, महेश जाधव, सिद्धू पुजारी, ईसुब पिरजादे, केदार सुरवसे, नंदू कांबळे, रमेश अपराध, कीर्तीपाल गायकवाड, विलास सरवदे, अजेय नागमोडे आदी मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

इफ्तार पार्टी म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक' इफ्तार पार्टीत घडले एकात्मतेचे प्रतीक मराठा सेवा संघाचा पुढाकार.

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी सलगर शाळेत नवागतांचा प्रवेशोत्सव संपन्न...

सोलापूर महानगरपालिकेचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. वाय. एच. पलोलू यांना पुन्हा म.न.पा सेवेत फेर नियुक्ती देण्याकरिता सोलापूरचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांना निवेदन सादर