निशब्द झाली सोलापूर जिल्हा परिषद... अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू; स्व. अजितदादा पवार यांना श्रद्धांजली.
प्रतिनिधी - सोलापूर
सोलापूर जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आज हुतात्मा दिनानिमित्त तसेच स्वर्गीय स्व. अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करताना वातावरण भावूक झाले.
सोलापूर जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आज हुतात्मा दिनानिमित्त तसेच स्वर्गीय स्व. अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करताना वातावरण भावूक झाले.
अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळत होते आणि संपूर्ण सभागृह निःशब्द झाले होते.जिल्हा परिषदेत आयोजित शोकसभेत अधिकारी-कर्मचारी हळहळ व्यक्त करत स्व. अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. प्रारंभी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या हस्ते स्व. अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर उपस्थितांनी दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली वाहिली.
यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मिनाक्षी वाकडे, बांधकाम कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले, अतिरिक्त मुख्य लेखा व वित्त अधिकारी शशीकिरण उबाळे, योजना शिक्षणाधिकारी सुलभा वठारे, प्रशासन अधिकारी अविनाश गोडसे, अधिक्षक गिरीष जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
शोकसभेचे सूत्रसंचालन जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी केले.
शोकसभेचे सूत्रसंचालन जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी केले.


Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240