सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी तेराव्यांदा विक्रम (बापू) खेलबुडे यांची निवड.
प्रतिनिधी – सोलापूर
सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विक्रम (बापू) खेलबुडे यांची सलग तेराव्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यांच्यासोबत सरचिटणीसपदी सागर सुरवसे तर खजिनदारपदी किरण बनसोडे यांची फेरनिवड झाली.
सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विक्रम (बापू) खेलबुडे यांची सलग तेराव्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यांच्यासोबत सरचिटणीसपदी सागर सुरवसे तर खजिनदारपदी किरण बनसोडे यांची फेरनिवड झाली.
![]() |
विक्रम (बापू)खेलबुडे यांचीअध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पत्रकार राम हुंडारे व सिद्धार्थ भडकुंबे यांच्या वतीने बुके देऊन सत्कार करताना... |
अध्यक्षपदासाठी किरण बनसोडे यांनी विक्रम खेलबुडे यांच्या नावाची सूचना केली, तर आप्पासाहेब पाटील यांनी अनुमोदन दिले. अशा प्रकारे खेलबुडे यांनी तेराव्यांदा अध्यक्षपदावर विराजमान होत विक्रम प्रस्थापित केला. या विश्वासास पात्र राहून काम करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ज्येष्ठ पत्रकार विजयकुमार देशपांडे व सहाय्यक अधिकारी अनिल कदम यांनी काम पाहिले. निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार सकाळचे सहयोगी संपादक सिद्धाराम पाटील, तरुण भारतचे निवासी संपादक विजयकुमार देशपांडे, पुढारीचे निवासी संपादक संजय पाठक, माजी अध्यक्ष प्रशांत जोशी, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष मनीष केत, इन सोलापूरचे प्रमुख समाधान वाघमोडे तसेच आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला.
नूतन कार्यकारिणी-
उपाध्यक्ष : विक्रम पाठक, आप्पासाहेब पाटील, उमेश कदम, आफताब शेख, नितीन पात्रे
चिटणीस :- संगमेश जेऊरे, भरतकुमार मोरे, कालिदास मासाळ, मिलिंद राऊळ
सहचिटणीस : बळीराम सर्वगोड, दीपक सोमा, अविनाश गायकवाड
कार्यकारिणी सदस्य :- विजयकुमार राजापुरे, अनिल कदम, विकास कस्तुरे, माधवी कुलकर्णी, व्यंकटेश दोंता, बाळकृष्ण दोड्डी, प्रभूलिंग वारशेट्टी, विठ्ठल आहेरवाडी, रामदास काटकर, प्रीतम पंडित, गौतम गायकवाड, अमोल साळुंखे, विकास चाटी, सचिन जाधव, संदीप येरवडे, मुजम्मिल शहानुरकर, श्रीनिवास मावनूर, सुदर्शन भालेराव
सल्लागार : -नारायण कारंजकर, जयप्रकाश अभंगे, चंद्रशेखर कव्हेकर
अभिनंदनाचा ठराव-
पत्रकार गृहनिर्माण प्रकल्पाच्या बाह्य सुविधांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी सात कोटींचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव सभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला. तसेच या कामी सहकार्य केल्याबद्दल शिवसेना (शिंदे गट) राज्य प्रवक्ता प्रा. डॉ. ज्योती वाघमारे व शिखर पहारिया फाऊंडेशन यांचाही गौरव करण्यात आला.
दरम्यान, नाशिक त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेधही या सभेत नोंदविण्यात आला.
Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240