जिल्हा परिषद सोलापूर येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा सीईओ कुलदीप जंगम यांच्या हस्ते ध्वजवंदन

प्रतिनिधी -सोलापूर 
सोलापूर जिल्हा परिषदेत भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) कुलदीप जंगम यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करून ध्वजवंदन करण्यात आले.
या कार्यक्रमास जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक चंद्रकांत जगताप, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मिनाक्षी वाकडे, सामान्य प्रशासन विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायती) सुर्यकांत भुजबळ, कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सचिन जगताप, शिक्षणाधिकारी कादर शेख, कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी, जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता सप्ताळे, गटविकास अधिकारी तसेच विविध विभागांचे प्रमुख अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
प्रारंभी हरीभाई देवकरण प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी राज्यगीत सादर केले. त्यानंतर जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी कुष्ठरोग निर्मूलनाची शपथ उपस्थितांकडून घेतली.
यावेळी सीईओ कुलदीप जंगम यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत संविधानिक मूल्ये जपण्याचे आवाहन केले. सीईओ कुलदीप जंगम व बालिका अभिज्ञा किरण ठोके यांच्या हस्ते हवेत तिरंगा रंगाचे फुगे सोडून प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
यानंतर जिल्हा परिषद मुख्यालयात सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी स्वीय सहाय्यक सुधाकर माने देशमुख, कक्ष अधिकारी अविनाश गोडसे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेहताब शेख यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

करजगी येथे श्री १०८ ष.ब्र.शिव सोमनाथ शिवाचार्य महास्वामीजी संस्थान हिरेमठ संस्थान मठाच्या मठाधिपतींचा भव्य पट्टाधिकार व पट्टाभिषेक सोहळा उत्साहात संपन्न.

संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त आपदा मित्र-सखींकडून स्वच्छता मोहीम

दुधनीतील बौध्द समाजांनी जे कामे सुचवतील त्या कामांना प्राधान्य देणार-अप्पु परमशेट्टी.