Posts

Showing posts from August, 2023

एस.व्ही.सी.एस हायस्कूल व ज्यु. कॉलेज,बोरामणी येथील विद्यार्थ्यांचे क्रिडा स्पर्धेत उत्तुंग यश.

Image
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा..! प्रतिनिधी - सोलापूर जिल्हा क्रिडा कार्यालय आणि पंचायत समिती, द.सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुका स्तरीय क्रिकेट स्पर्धेत प्रशालेच्या १७ वर्ष वयोगट(मुले) संघाने प्रथम क्रमांकG तसेच १९ वयोगट (मुले)संघाने द्वितीय क्रमांक पटकावून प्रशालेचे नाव उज्वल केल्याबद्दल सदर विद्यार्थ्यांना प्रशालेचे क्रिडा शिक्षक रवींद्र डोंबाळे आणि ज्यु. कॉलेजचे विनोद गोकळे सर यांनी कौतुक केले या विध्यार्थ्यांना मार्गदर्शनही सरांनीच केले होते. महात्मा गांधी ग्लोबल व्हिलेज इंग्लिश मिडीयम स्कूल बोरामणी येथे दोन दिवसीय स्पर्धात प्रशालेच्या संघांनी यश प्राप्त करत आपला दबदबा निर्माण केला. स्पर्धेत यश प्राप्त केलेल्या सर्व खेळाडूंचे प्रशालेचे मुख्याध्यापक अतनुरे सर आणि पर्यवेक्षक बिराजदार.एस. ए सर यांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला.तसेच सदर विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी मार्गदर्शन करणारे क्रिडा शिक्षक डोंबाळे सर यांचा देखील सत्कार मुख्याध्यापक, पर्यवेक्षक आणि खेळाडू विद्यार्थ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आल...

अक्कलकोट तालुक्यातील श्री बसवराज प्रशाला करजगी येथील विद्यार्थ्यांचे तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धेत घवघवीत यश.

Image
प्रतिनिधी - सोलापूर अक्कलकोट तालुका स्तरीय पावसाळी स्पर्धा २०२३-२४ आयोजित केलेल्या कबड्डी स्पर्धेत श्री बसवराज प्रशाला करजगी येथील वय वर्षे  १७ व १४ वयोगटातील विध्यार्थ्यांनी तालुक्यात प्रथम क्रमांक पटकाववल्याबद्दल श्री बसवेश्वर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ॲड.श्री दयानंद उंबरजे साहेबांनी  प्रशालेतील विजेते खेळाडूंचे पुष्प गुच्छ देऊन अभिनंदन केले  व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच  सर्व क्रिडा शिक्षकांचे आभार मानले. यावेळी प्राचार्य एस. बी.बिराजदार सर,पर्यवेक्षकसी.सी.चडचण सर,क्रिडा शिक्षक व विशेष मार्गदर्शक एस.बी.उंबरजे सर, स्वामी सर,हौशेट्टी सर सखाराम शिंदेसह प्रशालेतीव शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. ------------------------------------ ▪️जनता संघर्ष न्यूज ▪️ संपादक-सिध्दार्थ भडकुंबे ▪️ बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०

शंकर म्हेत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त आज दि.२५ऑगस्ट,२०२३ रोजी विविध उपक्रमांचे आयोजन.

Image
प्रतिनिधी - सोलापूर   काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शंकर म्हेत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत अशी माहिती संयोजकांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.दि.२५ऑगस्ट,२०२३ रोजी शंकरम्हेत्रे यांचा वाढदिवस आहे. वाढदिवसाचे औचित्य साधून लोकोपयोगी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. नेत्र तपासणी, रक्तदान,दंत तपासणी विविध आजारांची तपासणी करणे, त्याचबरोबर विद्यार्थ्यांना वही वाटप, उत्पन्न दाखले काढणे, वृक्षारोपण करणे, रहिवाशी दाखले काढणे असे अनेक उपक्रम अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथे मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहेत. म्हेत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी स्तुत्य उपक्रमांचे आयोजन केले जाते. यंदाही अनेक सामाजिक व प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. म्हेत्रे परिवाराने विजय असो किंवा पराभव असो कायमच जनतेशी नाळ कायम ठेवलेली आहे. त्यामुळे त्यांच्या प्रेमापोटी कार्यकर्ते पदाधिकारी यांच्याकडून यावर्षी देखील विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या उपक्रमांचा दुधनी शहर व परिसरातील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. --------------------...

व्यंकटेश्वर {बालाजी} मंदिराचे ब्रम्होत्सव मोठ्या भक्तीभावाने संपन्न.-गवंडी समाजाचा प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही अभूतपुर्व उत्साह महेश इंगळे व बसलिंगप्पा खेडगींच्या हस्ते पालखी सोहळ्याचे शुभारंभ.

Image
पालखी मिरवणुकीचे शुभारंभ करताना महेशजी इंगळे, बसलिंगप्पा खेडगी, चंद्रकांत गवंडी, श्रीमंत चेंडके, श्रीशैल गवंडी, अमोल गवंडी व इतर दिसत आहेत. प्रतिनिधी - अक्कलकोट  येथील नामधारी क्षत्रिय गवंडी समाज अक्कलकोटच्या वतीने शहरातील बुधवार पेठ येथील गवंडी समाजाच्या श्री वेंकटेश्वर देवस्थानच्या ८२ व्या वर्धापन दिनानिमित्त श्रींचा उत्सव मोठ्या श्रद्धेने व भक्तिभावाने साजरा करण्यात आला. आज गुरूवार दिनांक २४/०८/२०२३ तिथी निज श्रावण शुध्द अष्टमी उत्सव रोजी पहाटे ५ वाजता पारंपरिक पद्धतीने देवस्थानचे पुजारी पवन देसाई यांनी काकडआरती केली. सकाळी ६ ते ७ या वेळेत पारंपरिक पद्धतीने श्रीना तुपाचे अभिषेक करण्यात आले. तदनंतर सकाळी ७ वाजल्यापासून दिवसभर दर्शनाकरीता भाविकांना मंदिर खुले करण्यात आले. उत्सवानिमित्त मराठवाड्यातील उस्मानाबाद येथून भजन व दिंडी मंडळांना आमंत्रित करण्यात आले होते. सकाळी १० वाजता श्रींची सजविलेल्या पालखीचे पूजन अक्कलकोट एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन नगरसेवक बसलिंगप्पा खेडगी यांचे हस्ते संपन्न होऊन, श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन व माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक महे...

स्वामी समर्थ हे विश्वशांतीचे प्रतीक - मा.पो.महासंचालक वर्मा

Image
संजय कुमार वर्मा व कुटूंबियांचा सत्कार करताना महेश इंगळे, पो.नि.जितेंद्र कोळी व अन्य दिसत आहेत. प्रतिनिधी - अक्कलकोट अनंत कोटी ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थ महाराज म्हणजे जगाच्या कल्याणासाठी अवतरलेले अवलिया आहेत. त्यांच्या मूर्त स्वरूपात प्रचंड शांतीचे सामर्थ्य आहे. स्वामी समर्थांच्या मूर्त स्वरूपाकडे पाहिल्यानंतर मनातील कोणत्याही प्रकारची भीती, शंका, चिंता नष्ट होते, म्हणून मन स्वामी भक्तीकडे, स्वामींच्या दृष्टीस्मरणाकडे वळते. कारण येथील वटवृक्ष निवासी श्री स्वामी समर्थ महाराज हे विश्वशांतीचे प्रतीक असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे माजी अप्पर पोलीस महासंचालक संजय कुमार वर्मा  यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास सहकुटूंब भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी त्यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. यावेळी वर्मा बोलत होते. यावेळी उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी, धनराज शिंदे, मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटग...

स्वामी दर्शन व मंदीर समितीचे नियोजन पाहून प्रभावीत झालो - जिल्हाधिकारी आशिर्वाद.

Image
 स्वामी दर्शन व मंदीर समितीचे नियोजन पाहून प्रभावीत झालो - जिल्हाधिकारी आशिर्वाद. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचा सत्कार करताना महेश इंगळे व अन्य दिसत आहेत. प्रतिनिधी - अक्कलकोट श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेणे यासाठीही खूप मोठ भाग्य लागतो. आज जीवनात भारतीय प्रशासन सेवेचा सेवक असून सुद्धा स्वामी समर्थांचे दर्शन घेण्याची पर्वणी आजपर्यंत आपल्याला लाभलेली नव्हती. आज येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट दिल्यानंतर मंदिरातील स्वच्छता, भाविकांना स्वामी दर्शनाचे नियोजन, मंदिर समितीचे उपक्रम जाणून घेतल्यानंतर स्वामी दर्शनाने आपण भारावलो आहे, म्हणून स्वामी दर्शन व मंदिर समितीचे नियोजन पाहून आपण खूपच प्रभावित झालो असल्याचे मनोगत सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी व्यक्त केले.  ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन नगरसेवक महेश इंगळे यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचा स्वामी समर्थांचे कृपा वस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. याप्रसंगी जिल्हाधिकारी आ...

पंढरपूर तालुक्यातील मौजे नारायण चिंचोली येथे साहित्यरत्न लोकशाहीरआण्णाभाऊ साठे यांची १०३व्या जयंतीनिमित्त लहुजी शक्ती सेना नूतन शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न.

Image
प्रतिनिधी - पंढरपूर(जयसिंग मस्के) पंढरपूर तालुक्यातील मौजे नारायण चिंचोली येथे साहित्यरत्न लोकशाहीरआण्णाभाऊ साठे यांची १०३व्या जयंतीनिमित्त लहुजी शक्ती सेना नूतन शाखेचा उद्घाटन सोहळासंपन्न झाला. लहुजी शक्ती सेनेच्या नूतन शाखेचे उद्घाटन मा.लक्ष्मण तात्या धनवडे संचालक पांडुरंग सह.साखर कारखाना यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मा.देविदास कसबे पश्चिम महाराष्ट्र सचिव लहुजी शक्ती सेना मा.जयसिंग मस्के,जिल्हा उपाध्यक्ष, मा. मुकुंद घाडगे तालुकाध्यक्ष,सरगहिनीनाथ चव्हाण डेप्युटी सरपंच,नारायण भाऊ देशमुख माजी सरपंच ईश्वर वठार ज्ञानेश्वर मस्के ,नाना माने माजी सरपंच माजी सैनिक लक्ष्मण तात्या कोल्हे,  ता उपप्रमुख समाधान वायदंडे , संघटक बाळासाहेब वायदंडे,बालाजी खंदारे साहेब,आप्पा वाघमारे,धनाजी वायदंडे,आण्णा वायदंडे, सदाशिव कसबे. शरद लोखंडे  नारायण गुंड ,दत्ता बनसोडे, लहुजी शक्ती सेना शाखा नारायण चिंचोली शाखा अध्यक्ष -महेश  घाडगे ,उपाध्यक्ष रामभाऊ घाडगे सागर पाटोळे कार्याध्यक्ष संघटक आप्पा कांबळे ,रमेश घाडगे,हणुमंत घाडगे, बालाजी शिंदे ,रंजीत घाडगे ,मारुती गा...

श्री स्वामी समर्थांचे आशिर्वाद लाखमोलाचे - अभिनेत्री तावडे. 'सारं काही तिच्यासाठी' मालिकेच्या यशाकरीता स्वामींचरणी नतमस्तक.

Image
अभिनेता अशोक शिंदे, अभिनेत्री खुशबू तावडे, झी मराठी प्रसिद्धी प्रमुख पुरुषोत्तम गोखले, झी मराठी डिजिटल मार्केटिंग प्रमुख प्रद्युत घोगळे यांचा सत्कार करताना महेश इंगळे, प्रथमेश इंगळे व अन्य दिसत आहेत. प्रतिनिधी - अक्कलकोट अनेक स्वामी भक्तांप्रमाणे मी व माझे टीमही स्वामी भक्त असणे स्वाभाविक आहे. या औचित्याने आज आमच्या टीमचे छोट्या पडद्याच्या झी मराठी वरील कार्यकारी निर्माती भाग्यश्री कारेकर यांनी निर्माण केलेली व झी मराठी वाहिनीवर येत्या २१ ऑगस्ट पासून संध्याकाळी ७ वाजता प्रसारीत होणारी 'सारं काही तिच्यासाठी' मालिकेच्या यशाकरीता आज माझ्यासह आमच्या टीमने स्वामींचरणी नतमस्तक झालो असल्याचे मनोगत 'सारं काही तिच्यासाठी' मालिकेतील छोट्या पडद्यावरील मुख्य कलाकार अभिनेता अशोक शिंदे, अभिनेत्री खुशबू तावडे यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील आपल्या संघ सहकाऱ्यांसोबत येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरास भेट देवून श्री स्वामीचरणी नतमस्तक होत श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी मंदीर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी अभिनेता अशोक शिंदे, अभिनेत्री खुशब...

देशाला बौद्ध धम्मा शिवाय पर्याय नाही - दिनेश हनुमंते.

Image
प्रतिनिधी - अक्कलकोट (निंगप्पा निंबाळ.) बुद्धाच तत्वज्ञान अंगी अनुसरून समाज हितासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारती बौद्ध महा सभेची स्थापना करून ६० वर्षे झाली आहेत. हे प्रसार आणि प्रचार करण्यासाठी दि बुद्धीष्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्व खाली प्रत्येक राज्य, जिल्हा,तालुका, गावापर्यंत पोहचविण्याचे काम भारतीय बौध्द महासभा सध्या करत आहे.त्याच पार्श्भूमीवर अक्कलकोट तालुक्यातील काझीकणबस येथे भारतीय बौद्ध महा सभेच्या नूतन शाखेचे उदघाटन महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष दिनेश हणुमंते सर व महाराष्ट्र प्रदेश संघटक वैभव धबडगे सर यांच्या हस्ते करण्यात आले.सदर शाखा उद्घाटन सोहळा प्रसंगी सोलापूर जिल्हा अध्यक्ष राजश्री ताई गायकवाड,जिल्हा उपाध्यक्ष कमलाकर कांबळे,जिल्हा संघटक सिध्दाराम घटकांबळे,जिल्हा शहर अध्यक्ष पल्लवी अबुटे,तालुकाध्यक्ष दत्ता(भाऊ) कांबळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष दिनेश हणुमंते सर व प्रदेश संघटक वैभव धबडगे सर जिल्हा अध्यक्ष राजेश्री ताई गायकवाडजिल्हा प्रवक्ता प्रा.सागर सोनकांबळे सर आदी मान्यव...

पंचायत समिती दक्षिण सोलापूर,शिक्षण विभागातर्फे सन-२०२३मध्ये इ.५वी व इ.८वी शिष्यवृत्ती गुणवत्ता धारक विदयार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न.

Image
प्रतिनिधी - सोलापूर दि.९ ऑगस्ट,२०२३ क्रांती दिनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील विविध प्रशालांमध्ये इयत्ता ५ वी आणि इयत्ता ८ वी या वर्गात शिष्यवृत्ती परीक्षेत शिष्यवृत्तीस पात्र विद्यार्थ्यांचा सत्कार आणि गुणगौरव एस. व्ही सी.एस हायसकूल, बोरामणी, ता. द सोलापूर या प्रशालेत संपन्न झाला. कार्यक्रमच्या प्रारंभी प्रतिमा पूजन शिक्षणाधिकारी श्री. मल्हारी बनसोडे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.तद्नंतर कार्यक्रमास उपस्थित विस्तार अधिकारी श्री सणके साहेब,केंद्र प्रमुख शिंदे सर, बुलबुले मॅडम, सुतार मॅडम, डोगे सर,धोत्री प्रशालेचे मुख्याध्यापक धाये सर, दर्गनहळळी प्रशालेचे मुख्याध्यापक स्वामी सर यांचा स्वागत व सत्कार प्रशालेचे मुख्याध्यापक अतनुरे सर व पर्यवेक्षक  बिराजदार सर यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी विविध प्रशालेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि गुणगौरव उपस्थित अधिकारी, मुख्याध्यपक व शिक्षकां च्या हस्ते झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख  वनकडे वाय. एस यांनी केले तर आभार प्रदर्शन केंद्र प्रमुख  शिंदे सर यांनी केले मानले. ------------------------------------ ...

श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे कार्य आदर्शवत - पो.महासंचालक कृष्णप्रकश.

Image
पोलीस महासंचालक कृष्णप्रकाश यांचा सत्कार करताना देवस्थानचे सचिव आत्माराम घाटगे दिसत आहेत. प्रतिनिधी - सोलापूर राज्यातील विविध तीर्थक्षेत्रांच्या धरतीवर स्वामी समर्थांचे मूळस्थान असलेल्या अक्कलकोट नगरीतील मूळस्थान वटवृक्ष मंदिर समितीचे उपक्रम भाविकांच्या सोयीचे आहेत. गर्दीमध्ये सर्वोत्कृष्ट सोयी सुविधा देण्यासाठी मंदिर समितीचे नेहमीच सचोटीचे प्रयत्न असतात. त्यात नेहमी उत्कृष्ट सेवा देऊन महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर समिती भाविकांना नेहमीच सर्वोत्तम सोई सुविधा पुरवीत आहे. सर्वोत्तम सोयी सुविधांबरोबरच कमी वेळेत जास्तीत जास्त भाविकांच्या स्वामी दर्शनाचे नियोजन करण्याचे कार्य महेश इंगळे व मंदिर समिती विश्वस्तांनी हाती घेऊन ती यशस्वीपणे राबवित आहे याचे खूप मोठे समाधान वाटते. त्यामुळे श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे कार्य आदर्शवत असल्याचे मनोगत मुंबईचे अप्पर पोलीस महासंचालक कृष्णप्रकाश यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांच्या अध...

पत्रकार सुरक्षा समितीचे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख नागनाथ गणपा यांचा वाढदिवसनिमित्त सत्कार.

Image
प्रतिनिधी - सोलापूर पत्रकार सुरक्षा समिती जिल्हा प्रसिद्धीप्रमुख नागनाथ गणपा यांच्या वाढदिवसानिमित्त  पत्रकार सुरक्षा समिती व भारतीय जनता पार्टी मिशन मोदी मिशन मोदी अगेन पीएम यांच्या वतीने  वाढदिवस साजरा करण्यात आला.याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ(बुके)देऊन नागनाथ गणपा यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार, पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश उपाध्यक्ष बाळकृष्ण सदाफुले, पत्रकार सुरक्षा समितीचे जिल्हा अध्यक्ष दत्तात्रय पवार,पत्रकार सुरक्षा समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष सादिक शेख,पत्रकार सुरक्षा समितीचे शहर अध्यक्ष राम हुंडारे,दैनिक लोकशाही मतदारचे संपादक अक्षय बबलाद, साप्ताहिक दिव्य श्रम चे संपादक श्रीकांत कोळी,शिवानंद हिप्परगे,मिशन मोदी अगेन पीएम चे कार्यकारी अध्यक्ष महाराष्ट्र ॲडव्होकेट दिलीप जगताप व श्रीनिवास गोरला आदी उपस्थित होते. ------------------------------------ ▪️जनता संघर्ष न्यूज ▪️ संपादक-सिध्दार्थ भडकुंबे ▪️ बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०

क्रांतीसूर्य प्रतिष्ठान वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त गरजू लोकांना अन्नधान्य वाटप व विद्यार्थ्यांना वह्या वाटप.

Image
  प्रतिनिधी - सोलापूर क्रांतीसूर्य प्रतिष्ठान सोलापूर यांच्या वतीने सालाबादप्रमाणे  साहित्यरत्न,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०३ व्या जयंतीनिमित्त गरीब व गरजू लोकांना अन्नधान्य वाटप व शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा कार्यक्रम दि.१ऑगस्ट,२०२३ रोजी सोलापूर शहरातील गेंटयाल टाकीजवळील अशोक चौक या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून सर्पमित्र अनिल अलदर, पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार, प्रसिद्ध उद्योगपती इस्माईल उर्फ मुन्नाभाई शेख,क्रांतीसुर्य प्रतिष्ठानचे प्रमुख मार्गदर्शक शशिकांत उकरंडे,सेवानिवृत्त पीएसआय अनिल उकरंडे,अभिजित उकरंडे,महिला सामजिक कार्यकर्त्या अनिता कांबळे,संगीता धडे,अश्विनी लोंढे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून  विनम्र अभिवादन करण्यात आले. तद्नंतर  उपस्थित सर्वच प्रमुख पाहुण्यांचा सत्कार क्रांतीसूर्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आदर्श(भैया)धडे व प्रतिष्ठानचे प्रमुख मार्गदर्शक शशिकांत उकरंडे या...

साहित्यरत्न,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०३ वी जयंती मौजे भटूंबरे ता.पंढरपूर येथे साजरी.

Image
  प्रतिनिधी - पंढरपूर, (जयसिंग मस्के)  दि.१ऑगस्ट, २०२३ रोजी पंढरपूर तालुक्यातील मौजे भटूंबरे ता.पंढरपूर येथे महाराष्ट्र मातंग परिषदच्या वतीने, साहित्यरत्न,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०३ वी जयंती साजरी करण्यात आली. प्रारंभी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या  प्रतिमेचे पुष्पहार घालून सरपंच सौ.मंडाबाई ढवळे यांच्या हस्ते पूजन  करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा.गणेश वाघमारे जिल्हाअध्यक्ष महाराष्ट्र मातंग परिषद यांनीकेले. जयंतीनिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. याप्रसंगी बालाजी वाघमारे, ग्रामपंचायत सदस्य सावित्रा वाघमारे,महिला बचत गट अध्यक्ष मनिषा वाघमारे, संगिता आडगळे,लक्ष्मी वायदंडे,एकनाथ वाघमारे,करण आडगळे,युवराज वाघमारे,राहुल वाघमारे,चंदू वायदंडे मारूती मस्के,विक्रम वाघमारे,नाना वाघमारे, गहिनीनाथ वाघमारे,शाम कसबे आदींसह समाजातील लहान थोर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित सर्वच समाज बांधवांचे  आभार अण्णाभाऊ साठे युवक संघटना अध्यक्ष योगेश मस्के यांनी मानले. -----------------------------...