स्वामी समर्थ हे विश्वशांतीचे प्रतीक - मा.पो.महासंचालक वर्मा

संजय कुमार वर्मा व कुटूंबियांचा सत्कार करताना महेश इंगळे, पो.नि.जितेंद्र कोळी व अन्य दिसत आहेत.



प्रतिनिधी-अक्कलकोट
अनंत कोटी ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थ महाराज म्हणजे जगाच्या कल्याणासाठी अवतरलेले अवलिया आहेत. त्यांच्या मूर्त स्वरूपात प्रचंड शांतीचे सामर्थ्य आहे. स्वामी समर्थांच्या मूर्त स्वरूपाकडे पाहिल्यानंतर मनातील कोणत्याही प्रकारची भीती, शंका, चिंता नष्ट होते, म्हणून मन स्वामी भक्तीकडे, स्वामींच्या दृष्टीस्मरणाकडे वळते. कारण येथील वटवृक्ष निवासी श्री स्वामी समर्थ महाराज हे विश्वशांतीचे प्रतीक असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे माजी अप्पर पोलीस महासंचालक संजय कुमार वर्मा यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास सहकुटूंब भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी त्यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. यावेळी वर्मा बोलत होते. यावेळी उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी, धनराज शिंदे, मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी,  प्रसाद सोनार, संजय पवार, श्रीकांत मलवे, व्यंकटेश पुजारी, स्वामीनाथ लोणारी, दीपक गवळी, आदींसह स्वामी भक्त उपस्थित होते.
---------------------------------------
▪️जनता संघर्ष न्यूज ▪️संपादक-सिध्दार्थ भडकुंबे
▪️बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०

Comments

Popular posts from this blog

करजगी येथे श्री १०८ ष.ब्र.शिव सोमनाथ शिवाचार्य महास्वामीजी संस्थान हिरेमठ संस्थान मठाच्या मठाधिपतींचा भव्य पट्टाधिकार व पट्टाभिषेक सोहळा उत्साहात संपन्न.

संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त आपदा मित्र-सखींकडून स्वच्छता मोहीम

कोनापुरे चाळ नागरी आरोग्य केंद्रात अमित कांबळे यांचा सन्मानपूर्वक सत्कार.