शंकर म्हेत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त आज दि.२५ऑगस्ट,२०२३ रोजी विविध उपक्रमांचे आयोजन.

प्रतिनिधी -सोलापूर 
काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शंकर म्हेत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत अशी माहिती संयोजकांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.दि.२५ऑगस्ट,२०२३ रोजी शंकरम्हेत्रे यांचा वाढदिवस आहे. वाढदिवसाचे औचित्य साधून लोकोपयोगी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. नेत्र तपासणी, रक्तदान,दंत तपासणी विविध आजारांची तपासणी करणे, त्याचबरोबर विद्यार्थ्यांना वही वाटप, उत्पन्न दाखले काढणे, वृक्षारोपण करणे, रहिवाशी दाखले काढणे असे अनेक उपक्रम अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथे मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहेत. म्हेत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी स्तुत्य उपक्रमांचे आयोजन केले जाते. यंदाही अनेक सामाजिक व प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
म्हेत्रे परिवाराने विजय असो किंवा पराभव असो कायमच जनतेशी नाळ कायम ठेवलेली आहे. त्यामुळे त्यांच्या प्रेमापोटी कार्यकर्ते पदाधिकारी यांच्याकडून यावर्षी देखील विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या उपक्रमांचा दुधनी शहर व परिसरातील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
------------------------------------
▪️जनता संघर्ष न्यूज ▪️संपादक-सिध्दार्थ भडकुंबे
▪️बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०



Comments

Popular posts from this blog

करजगी येथे श्री १०८ ष.ब्र.शिव सोमनाथ शिवाचार्य महास्वामीजी संस्थान हिरेमठ संस्थान मठाच्या मठाधिपतींचा भव्य पट्टाधिकार व पट्टाभिषेक सोहळा उत्साहात संपन्न.

संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त आपदा मित्र-सखींकडून स्वच्छता मोहीम

दुधनीतील बौध्द समाजांनी जे कामे सुचवतील त्या कामांना प्राधान्य देणार-अप्पु परमशेट्टी.