पंचायत समिती दक्षिण सोलापूर,शिक्षण विभागातर्फे सन-२०२३मध्ये इ.५वी व इ.८वी शिष्यवृत्ती गुणवत्ता धारक विदयार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न.
प्रतिनिधी -सोलापूर
दि.९ ऑगस्ट,२०२३ क्रांती दिनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील विविध प्रशालांमध्ये इयत्ता ५ वी आणि इयत्ता ८ वी या वर्गात शिष्यवृत्ती परीक्षेत शिष्यवृत्तीस पात्र विद्यार्थ्यांचा सत्कार आणि गुणगौरव एस. व्ही सी.एस हायसकूल, बोरामणी, ता. द सोलापूर या प्रशालेत संपन्न झाला.
कार्यक्रमच्या प्रारंभी प्रतिमा पूजन शिक्षणाधिकारी श्री. मल्हारी बनसोडे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.तद्नंतर कार्यक्रमास उपस्थित विस्तार अधिकारी श्री सणके साहेब,केंद्र प्रमुख शिंदे सर, बुलबुले मॅडम, सुतार मॅडम, डोगे सर,धोत्री प्रशालेचे मुख्याध्यापक धाये सर, दर्गनहळळी प्रशालेचे मुख्याध्यापक स्वामी सर यांचा स्वागत व सत्कार प्रशालेचे मुख्याध्यापक अतनुरे सर व पर्यवेक्षक बिराजदार सर यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी विविध प्रशालेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि गुणगौरव उपस्थित अधिकारी, मुख्याध्यपक व शिक्षकां च्या हस्ते झाला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख वनकडे वाय. एस यांनी केले तर आभार प्रदर्शन केंद्र प्रमुख शिंदे सर यांनी केले मानले.
Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240