क्रांतीसूर्य प्रतिष्ठान वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त गरजू लोकांना अन्नधान्य वाटप व विद्यार्थ्यांना वह्या वाटप.
प्रतिनिधी - सोलापूर
क्रांतीसूर्य प्रतिष्ठान सोलापूर यांच्या वतीने सालाबादप्रमाणे साहित्यरत्न,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०३ व्या जयंतीनिमित्त गरीब व गरजू लोकांना अन्नधान्य वाटप व शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा कार्यक्रम दि.१ऑगस्ट,२०२३ रोजी सोलापूर शहरातील गेंटयाल टाकीजवळील अशोक चौक या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता.
सदर कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून सर्पमित्र अनिल अलदर,
पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार, प्रसिद्ध उद्योगपती इस्माईल उर्फ मुन्नाभाई शेख,क्रांतीसुर्य प्रतिष्ठानचे प्रमुख मार्गदर्शक शशिकांत उकरंडे,सेवानिवृत्त पीएसआय अनिल उकरंडे,अभिजित उकरंडे,महिला सामजिक कार्यकर्त्या अनिता कांबळे,संगीता धडे,अश्विनी लोंढे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. तद्नंतर उपस्थित सर्वच प्रमुख पाहुण्यांचा सत्कार क्रांतीसूर्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आदर्श(भैया)धडे व प्रतिष्ठानचे प्रमुख मार्गदर्शक शशिकांत उकरंडे यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आदर्श(भैया) धडे यांनी केले.कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगतरूपी विचार व्यक्त केले.याप्रसंगी सेवानिवृत्त पीएसआय अनिल उकरंडे उकरणे म्हणाले की, क्रांतीसुर्य प्रतिष्ठानचे कार्य हे कौतुकास्पद आहे.प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदर्श (भैया)धडे हे नेहमीच जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करतात त्यांच्या या कार्यास व पुढील वाटचालीस माझ्या शुभेच्छा आहेत.कार्यक्रमाप्रसंगी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधून गरीब व गरजू लोकांना अन्नधान्य वाटप व शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष चेतन लोंढे,सचिव नितीन बनसोडे,उत्सव अध्यक्ष नंदकिशोर दिडवाणी,अजय धडे, संजय डोलारे,मल्हारी कांबळे,सचिनकुमार तांदळे,रमेश दाते शिवानंद जंजोटकर आदीसह महिलावर्ग बहुसंख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धार्थ भडकुंबे यांनी केले तर आभार आदर्श धडे यांनी मानले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धार्थ भडकुंबे यांनी केले तर आभार आदर्श धडे यांनी मानले.
------------------------------------
Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240