एस.व्ही.सी.एस हायस्कूल व ज्यु. कॉलेज,बोरामणी येथील विद्यार्थ्यांचे क्रिडा स्पर्धेत उत्तुंग यश.
![]() |
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा..! |
प्रतिनिधी - सोलापूर
जिल्हा क्रिडा कार्यालय आणि पंचायत समिती, द.सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुका स्तरीय क्रिकेट स्पर्धेत प्रशालेच्या १७ वर्ष वयोगट(मुले) संघाने प्रथम क्रमांकG तसेच १९ वयोगट (मुले)संघाने द्वितीय क्रमांक पटकावून प्रशालेचे नाव उज्वल केल्याबद्दल सदर विद्यार्थ्यांना प्रशालेचे क्रिडा शिक्षक रवींद्र डोंबाळे आणि ज्यु. कॉलेजचे विनोद गोकळे सर यांनी कौतुक केले या विध्यार्थ्यांना मार्गदर्शनही सरांनीच केले होते.
महात्मा गांधी ग्लोबल व्हिलेज इंग्लिश मिडीयम स्कूल बोरामणी येथे दोन दिवसीय स्पर्धात प्रशालेच्या संघांनी यश प्राप्त करत आपला दबदबा निर्माण केला.
स्पर्धेत यश प्राप्त केलेल्या सर्व खेळाडूंचे प्रशालेचे मुख्याध्यापक अतनुरे सर आणि पर्यवेक्षक बिराजदार.एस. ए सर यांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला.तसेच सदर विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी मार्गदर्शन करणारे क्रिडा शिक्षक डोंबाळे सर यांचा देखील सत्कार मुख्याध्यापक, पर्यवेक्षक आणि खेळाडू विद्यार्थ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक अतनुरे सर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करत अधिकाधिक विद्यार्थ्यांनी मैदानी खेळात सहभागी होऊन मोबाईल वरील खेळ टाळवेत आणि मैदानी खेळ कसे आरोग्याला फायद्याचे आहेत याविषयी आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी प्रशालेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240