Posts

नविन पिढीला शिक्षणासोबत संस्काराची गरज - शरण पाटील.

Image
नविन पिढीला शिक्षणासोबत संस्काराची गरज - शरण पाटील प्रतिनिधी - उमरगा   आपल्याला कोणत्याही क्षेत्रात यश संपादन करण्यासाठी उत्तम शिक्षण व सुसंस्काराची गरज आहे. आई वडीलांसह शिक्षकांच्या हातुनच हे पवित्र कार्य होऊ शकते असे मत उमरगा जनता सहकारी बँकेचे चेअरमन शरण पाटील यांनी व्यक्त केले. तालुक्यातील डिग्गी येथे मंगळवारी (ता. १४) रोजी महात्मा गांधी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या वतीने शिक्षकांचा सत्कार व कृतज्ञता सोहळा आयोजीत करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. महात्मा गांधी विद्यालयाचे सचिव संजय डिग्गीकर अध्यक्षस्थानी होते. पंचायत समितीचे माजी सभापती सचिन पाटील, महात्मा गांधी विद्यालयाचे सचिव संजय डिग्गीकर,संचालक प्रा. युसुफ मुल्ला, विठ्ठलसाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजीव हेबळे, प्रा. शौकत पटेल, माजी नगरसेवक महेश माशाळकर, माजी सरपंच सिद्धाराम कवठे, योगेश राठोड, विजेता अॅकॅडमीचे संचालक सतीश जाधव, पुणेकर ग्रुपचे अध्यक्ष सचिन हेबळे, उपाध्यक्ष विरेंद्र पाटील, उपसरपंच युवराज कर्पे उपस्थित होते. u पुढे बोलताना श्री. पाटील म्हणाले की, युवकांनी आपल्या कर्तत्वाने व्यवसाय सुरू करून प्रगती क...

सोशल मीडियाचा वापर करून भारतीय जनता पक्षाचे सदस्य व्हा-शरण बसवराज पाटील.

Image
मुरूम, ता. उमरगा येथील माधवराव पाटील महाविद्यालयात भाजप सदस्य नोंदणी अभियानाप्रसंगी शरण पाटील बोलताना अशोक सपाटे, श्रीराम पेठकर व अन्य पदाधिकारी. मुरूम, ता. उमरगा, ता.१६ (प्रतिनिधी) भारतीय जनता पक्ष हा देशात सर्वात मोठा पक्ष असून जगात सर्वात जास्त सदस्य संख्या या पक्षाची आहे. त्यामुळे उमरगा-लोहारा तालुक्यातून जास्तीत जास्त सदस्यता नोंदणी करावी, असे प्रतिपादन शरण बसवराज पाटील यांनी केले. मुरूम येथील माधवराव पाटील महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात गुरुवारी (ता. १६) रोजी आयोजित भाजपा सदस्यता नोंदणी महा अभियान प्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्राचार्य डॉ. अशोक सपाटे, प्राचार्य डॉ. श्रीराम पेठकर, माजी जिल्हा परिषद सदस्य रफिक तांबोळी, माजी पंचायत समिती सभापती सचिन पाटील, नाईकनगरचे सरपंच योगेश राठोड, रितेश जाधव, गौस शेख, सुजित शेळके, अप्पू गुंजोटे आदींची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी योगेश राठोड, सचिन पाटील, रफिक तांबोळी, अरबाज शेख, निर्मलकुमार लिमये यांनी मनोगत व्यक्त केले.  डॉ. श्रीराम पेठकर म्हणाले की, सध्या सर्वांकडे स्मार्टफोन आहे. त्यामुळे फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाट्सअप या सोशल मी...

हटकर समाज संघटना व शूरवीर संभाजी करवर प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम

Image
प्रतिनिधी-सोलापूर आपण या समजाचे काहीतरी देणे लागतो या उद्देशाने हटकर समाज संघटना व शूरवीर संभाजी करवर प्रतिष्ठानच्या वतीने चांगले स्तुत्य कार्य सुरू आहे.हे कार्य राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचवण्याची गरज आहे. समाजातील तरुणांनी अश्या कार्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे.असे आवाहन ज्ञानदेव करवर यांनी केले. हटकर संघटना व शूरवीर संभाजी करवर प्रतिष्ठांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वधू-वर परिचय मेळाव्यात अध्यक्ष स्थानावरून ज्ञानदेव करवर बोलत होते.प्रारंभी विचारपीठावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. नववधू-वरांची लग्नपत्रिका किंवा जन्म कुंडली बघण्याची आवश्यकता नाही कारण त्याला शास्त्राचा आधार नाही सोयरीक जुळवताना जवळचे नातेवाईकांच्या नात्याच्या पलीकडचे नाते जोडावे मुला- मुलीच्या अधिक अपेक्षा व  महत्वकांक्षेमुळे मुला- मुलीचे योग्य त्यावेळी परिस्थितीनुरूप लग्न होणे अपेक्षित आहे. लग्न हा कौटुंबिक सोहळा आहे तो साध्या पद्धतीने करावा. त्याला राजकीय स्वरूप येऊ देऊ नये. लग्नामध्ये लग्नपत्रिका,हार - तुरे सत्कार समारंभ शक्यतो टाळावे.असे मत कार्यक्रमचे अतिथी तथा उद्घाटक पुण्यश्...

सोलापूर शिवसेना महिला आघाडी तर्फे महिलांना उद्योजकिय प्रशिक्षण...

Image
  प्रतिनिधी-सोलापूर        राणी लक्ष्मीबाई बहुउद्देशीय महिला संस्था प्रमुख तथा, सोलापूर शिवसेना महिला आघाडीच्या सोलापूर शहर महिला उपप्रमुख अनिताताई गवळी यांनी बेरोजगार व गरीब-होतकरू महिलांसाठी, थोबडे वस्ती येथील समाज मंदिर येथे रोजगार मेळावा घेतला. याप्रसंगी शिवसेना प्रवक्त्या तथा, आमदार डाॅ. मनिषाताई कायंदे यांनी सदिच्छा भेट देऊन, या बेरोजगार, होतकरु महिलांना प्रोत्साहन दिले. यामध्ये इलेक्ट्रॉनिक बल्ब तयार करणे, फॅशन डिझायन, शिलाईकाम यांसारख्या उद्योगाचे प्रशिक्षण देण्यात आले. उद्योजिका सौ. अपर्णा माने यांनी महिलांना इलेक्ट्रॉनिक बल्बच्या माळा तयार करण्याचे प्रशिक्षण दिले. तर, सौ. अश्विनी नंदुरकर यांनी महिलांना योगाचे महत्व सांगितले.         या प्रशिक्षण मुळे महिला स्वावलंबी बनतील, अशी भावना आमदार कायंदे ताई यांनी व्यक्त करुन, महिलांचे कौतुक केले. या प्रसंगी जिल्हा प्रमुख अमोलबापू शिंदे, राजकुमार शिंदे, जयश्री पवार, सुनंदा साळुंके, शशिकला कस्पटे, संगिता खांबसकर, आदी पदाधिकारी उपस्थित होते. या प्रशिक्षणाचा परिसरातील बहुसंख्य महिलांनी लाभ घेतल...

प्रथमेश इंगळेंच्या हस्ते डॉ.स्वरुपा स्वामी यांच्या स्वामी डेंटल केअरचे शुभारंभ.

Image
प्रतिनिधी - अक्कलकोट  मल्लीकार्जून मंदीर परिसरातील डॉ.स्वरूपा स्वामी यांच्या नुतन स्वामी डेंटल केअरचे शुभारंभ श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांच्या अधिपत्याखाली प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी बोलताना प्रथमेश इंगळे यांनी ज्योतिषाचार्य कै.मल्लिनाथ स्वामी यांच्या सेवाभावी वृत्तीने प्रेरित होऊन त्यांच्या स्नुषा डॉ.स्वरूपा स्वामी यांनी गोरगरीब रुग्णांना आधुनिक पद्धतीच्या दंतचिकित्सा या अल्प दरात अक्कलकोट सारख्या ठिकाणी देण्याचा मानस बाळगून या स्वामी डेंटल केअरची स्थापना केलेली आहे. त्यांच्या या वैद्यकीय सेवेस श्री स्वामी समर्थांचे आशीर्वाद म्हणून स्वामींचे  कृपावस्त्र व प्रतिमा तसेच आमच्या शुभेच्छा देऊन सन्मान केले असल्याचे मनोगत व्यक्त केले. यावेळी डॉ.स्वरूपा स्वामी, निलेश स्वामी, चन्ना विभुते, दर्शन घाटगे, तुषार मोरे, धनराज स्वामी, श्रीशैल गवंडी, श्रीकांत मलवे, खाजप्पा झंपले, विपुल जाधव, इत्यादी उपस्थित होते.  -------------------------------------- ▪️ जनता संघर्ष न्यूज,सोलापूर ▪️ सिध्दार्थ भडकुंबे-संपादक 👉 बातम्या व जाहिरातीसाठ...