हटकर समाज संघटना व शूरवीर संभाजी करवर प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम
प्रतिनिधी-सोलापूर
आपण या समजाचे काहीतरी देणे लागतो या उद्देशाने हटकर समाज संघटना व शूरवीर संभाजी करवर प्रतिष्ठानच्या वतीने चांगले स्तुत्य कार्य सुरू आहे.हे कार्य राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचवण्याची गरज आहे. समाजातील तरुणांनी अश्या कार्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे.असे आवाहन ज्ञानदेव करवर यांनी केले. हटकर संघटना व शूरवीर संभाजी करवर प्रतिष्ठांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वधू-वर परिचय मेळाव्यात अध्यक्ष स्थानावरून ज्ञानदेव करवर बोलत होते.प्रारंभी विचारपीठावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले.
नववधू-वरांची लग्नपत्रिका किंवा जन्म कुंडली बघण्याची आवश्यकता नाही कारण त्याला शास्त्राचा आधार नाही सोयरीक जुळवताना जवळचे नातेवाईकांच्या नात्याच्या पलीकडचे नाते जोडावे मुला- मुलीच्या अधिक अपेक्षा व महत्वकांक्षेमुळे मुला- मुलीचे योग्य त्यावेळी परिस्थितीनुरूप लग्न होणे अपेक्षित आहे.
लग्न हा कौटुंबिक सोहळा आहे तो साध्या पद्धतीने करावा. त्याला राजकीय स्वरूप येऊ देऊ नये. लग्नामध्ये लग्नपत्रिका,हार - तुरे सत्कार समारंभ शक्यतो टाळावे.असे मत कार्यक्रमचे अतिथी तथा उद्घाटक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे माजी प्रभारी कुलगुरू एस आय पाटील यांनी सांगितले.यावेळी प्रशासन अधिकारी शिक्षण विभागाचे चंद्रकांत होळकर,पोलीस निरीक्षक गोदे,मार्गदर्शक साहेबराव पाटील ,युवा नेते नाथा पाटील , निवृत्त पोलीस अधिकारी रानगर ,राजू नाईकवाडी, रुक्मिणी मल्टीपर्पज हॉलचे महादेव येजगर्, विजय येजगर ,डॉ. नितीन चौडे डॉक्टर एस एम दबडे, अँड.बंडू पाटील बंडगर गुरुजी ,नितीन जूजारे ,तातोबा टेकनर ,अँड .शरद पाटील, शिवानी उद्योग समूहाचे विश्वास निळे मारुती भूसणर ,विजय येजगर, विजय भुसणर ,नवनाथ पाटील ,कर्तव्य संस्थेचे हेमंत पाटील बाबुराव सोपे कृषिरत्न सदाशिव चौगुले ,बापूसाहेब दबडे, सूर्यकांत खुळे, अशोक करताडे ,पांडुरंग पाटील ,जय अप्पा बेलदार बाळासाहेब कोरके, पैलवान नितीन निळे जालिंदर चौगुले महाराज सुरेश पाटील, नामदेव घुणे बंडू सोपे, बापू निळे, कृषी अधिकारी सुनील पाटील जगन्नाथ येजगर पाटील नितीन करवर, सुखदेव बंडगर, मारुती घुणे, आप्पासाहेब व्हालगळ, दीपक मगर, मधुकर करताडे, सुकदेव भुसनर श्री व सौ राज्यश्री चौगुले युवा कार्यकर्ता रोहन पाटील आधी उपस्थित होते हटकर समाज हा वेगवेगळ्या भागात विखुरलेला असून प्रामुख्याने शेती व्यवसाय आहे राजकीय क्षेत्रापासून वंचित असलेल्या या समाजाला शासन दरबारी स्थान मिळाले पाहिजे तसेच शासनाकडून विविध योजनांचा लाभ मिळाला पाहिजे शासनाच्या मुख्य प्रवाहात हटकर समाज आला पाहिजे त्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत मुख्याध्यापक भूसनर सर यांनी व्यक्त केले.
देशातील अनेक जाती आर्थिक , सामाजिक,शैक्षणिक क्षेत्रात विकास पासून दूर आहेत स्वातंत्र्यानंतर ही हटकर समाजाचे प्रश्न कायम असल्याचे मत दत्तात्रय भुसणर यांनी सांगितले समाजाचा चौफेर विकासासाठी तरुणांनी एकत्र येण्याची गरज असून आपले मूलभूत प्रश्नासाठी संघर्षाची तयारी करावी असे कृषी उत्पन्न बाजार समिती फलटणचे संचालक शंभूराज विनायक पाटील यांनी सांगितले तर समाजाचे प्रलंबित प्रश्न ,समस्या ,अडचण शासनापर्यंत पोहोचविणार व शिक्षणातून समाजाचे परिवर्तन होऊ शकते .
शूर वीर संभाजी करवर हे छत्रपती शिवाजी महाराज
यांच्या दहा अंगरक्षकापैकी एक महत्वाचे अंगरक्षक होते असे शिंदे गटाचे युवा नेते विजयराज मरगर यांनी सांगितले यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे दशरथ यमगर यांचा सेवा निवृत्ती निमित्त समजमार्फत सत्कार करण्यात आला लोकशक्ती चॅनलचे नामदेव लकडे यांचाही सत्कार करण्यात आला यावेळी पोलीस निरीक्षक गोदे ,सुखदेव पाटील यांनी मनोगत व्यक्त केले घोरपडी गावचे गजी ढोल कलाकार यांनी कार्यक्रम सादर केला संघटनेचे पदाधिकारी सर्व ग्रामस्थ महिला व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शूर वीर संभाजी करवर हे छत्रपती शिवाजी महाराज
यांच्या दहा अंगरक्षकापैकी एक महत्वाचे अंगरक्षक होते असे शिंदे गटाचे युवा नेते विजयराज मरगर यांनी सांगितले यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे दशरथ यमगर यांचा सेवा निवृत्ती निमित्त समजमार्फत सत्कार करण्यात आला लोकशक्ती चॅनलचे नामदेव लकडे यांचाही सत्कार करण्यात आला यावेळी पोलीस निरीक्षक गोदे ,सुखदेव पाटील यांनी मनोगत व्यक्त केले घोरपडी गावचे गजी ढोल कलाकार यांनी कार्यक्रम सादर केला संघटनेचे पदाधिकारी सर्व ग्रामस्थ महिला व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी लक्ष्मण निळे यांनी मनोगत व्यक्त केले प्रस्ताविक मुकुंद होळकर यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आबासो पाटील तर आभार प्रदर्शन अण्णासाहेब बसणार महाराज यांनी मानले.
--------------------------------------▪️जनता संघर्ष न्यूज,सोलापूर▪️सिध्दार्थ भडकुंबे-संपादक
Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240