नविन पिढीला शिक्षणासोबत संस्काराची गरज - शरण पाटील.

नविन पिढीला शिक्षणासोबत संस्काराची गरज - शरण पाटील
प्रतिनिधी-उमरगा 



आपल्याला कोणत्याही क्षेत्रात यश संपादन करण्यासाठी उत्तम शिक्षण व सुसंस्काराची गरज आहे. आई वडीलांसह शिक्षकांच्या हातुनच हे पवित्र कार्य होऊ शकते असे मत उमरगा जनता सहकारी बँकेचे चेअरमन शरण पाटील यांनी व्यक्त केले.
तालुक्यातील डिग्गी येथे मंगळवारी (ता. १४) रोजी महात्मा गांधी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या वतीने शिक्षकांचा सत्कार व कृतज्ञता सोहळा आयोजीत करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.महात्मा गांधी विद्यालयाचे सचिव संजय डिग्गीकर अध्यक्षस्थानी होते.पंचायत समितीचे माजी सभापती सचिन पाटील, महात्मा गांधी विद्यालयाचे सचिव संजय डिग्गीकर,संचालक प्रा. युसुफ मुल्ला, विठ्ठलसाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजीव हेबळे, प्रा. शौकत पटेल, माजी नगरसेवक महेश माशाळकर, माजी सरपंच सिद्धाराम कवठे, योगेश राठोड, विजेता अॅकॅडमीचे संचालक सतीश जाधव, पुणेकर ग्रुपचे अध्यक्ष सचिन हेबळे, उपाध्यक्ष विरेंद्र पाटील, उपसरपंच युवराज कर्पे उपस्थित होते.


पुढे बोलताना श्री. पाटील म्हणाले की, युवकांनी आपल्या कर्तत्वाने व्यवसाय सुरू करून प्रगती करण्याचे आवाहन केले.
राजेंद्र चापाले, डी. वाय.माने, मुख्याध्यापक सुधाकर बिराजदार, के.एम. माने, बसवराज हावशेट्टे, अशोक घोडके, किसन साखरे, दिलीप सुरवसे, संतोष पाटील, आशिष चौधरी, अशोक पावडशेट्टी, कमलाकर एकंबे आदी शिक्षकांचा कृतज्ञता प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
प्रा. शौकत पटेल, सतीष जाधव यांची भाषणे झाली. प्रा. युसुफ मुल्ला यांनी प्रास्ताविक केले. युवराज गायकवाड यांनी सुत्रसंचलन केले.विरेंद्र पाटील यांनी आभार मानले. 
महाविर माशाळे, विजयानंद पाटील, प्रदीप कोकळे, सोमनाथ महाजन, भिमाशंकर पाटील, रामलिंग स्वामी, लिंगराज स्वामी, मल्लिकार्जुन पावडशेट्टी, राहुल हेबळे, अमित हेबळे, राहुल कवठे, अॅड.फिरोज मुल्ला, महेश हेबळे, विरेश जमादार, गुरूनाथ मंठाळे आदींनी यासाठी पुढाकार घेतला.
--------------------------------------▪️जनता संघर्ष न्यूज,सोलापूर▪️सिध्दार्थ भडकुंबे-संपादक
👉बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०

 



Comments

Popular posts from this blog

इफ्तार पार्टी म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक' इफ्तार पार्टीत घडले एकात्मतेचे प्रतीक मराठा सेवा संघाचा पुढाकार.

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी सलगर शाळेत नवागतांचा प्रवेशोत्सव संपन्न...

सोलापूर महानगरपालिकेचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. वाय. एच. पलोलू यांना पुन्हा म.न.पा सेवेत फेर नियुक्ती देण्याकरिता सोलापूरचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांना निवेदन सादर