सोलापूर शिवसेना महिला आघाडी तर्फे महिलांना उद्योजकिय प्रशिक्षण...
प्रतिनिधी-सोलापूर
राणी लक्ष्मीबाई बहुउद्देशीय महिला संस्था प्रमुख तथा, सोलापूर शिवसेना महिला आघाडीच्या सोलापूर शहर महिला उपप्रमुख अनिताताई गवळी यांनी बेरोजगार व गरीब-होतकरू महिलांसाठी, थोबडे वस्ती येथील समाज मंदिर येथे रोजगार मेळावा घेतला. याप्रसंगी शिवसेना प्रवक्त्या तथा, आमदार डाॅ. मनिषाताई कायंदे यांनी सदिच्छा भेट देऊन, या बेरोजगार, होतकरु महिलांना प्रोत्साहन दिले. यामध्ये इलेक्ट्रॉनिक बल्ब तयार करणे, फॅशन डिझायन, शिलाईकाम यांसारख्या उद्योगाचे प्रशिक्षण देण्यात आले. उद्योजिका सौ. अपर्णा माने यांनी महिलांना इलेक्ट्रॉनिक बल्बच्या माळा तयार करण्याचे प्रशिक्षण दिले. तर, सौ. अश्विनी नंदुरकर यांनी महिलांना योगाचे महत्व सांगितले.
या प्रशिक्षण मुळे महिला स्वावलंबी बनतील, अशी भावना आमदार कायंदे ताई यांनी व्यक्त करुन, महिलांचे कौतुक केले. या प्रसंगी जिल्हा प्रमुख अमोलबापू शिंदे, राजकुमार शिंदे, जयश्री पवार, सुनंदा साळुंके, शशिकला कस्पटे, संगिता खांबसकर, आदी पदाधिकारी उपस्थित होते. या प्रशिक्षणाचा परिसरातील बहुसंख्य महिलांनी लाभ घेतला.
--------------------------------------▪️जनता संघर्ष न्यूज,सोलापूर▪️सिध्दार्थ भडकुंबे-संपादक
Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240