प्रथमेश इंगळेंच्या हस्ते डॉ.स्वरुपा स्वामी यांच्या स्वामी डेंटल केअरचे शुभारंभ.
प्रतिनिधी - अक्कलकोट
मल्लीकार्जून मंदीर परिसरातील डॉ.स्वरूपा स्वामी यांच्या नुतन स्वामी डेंटल केअरचे शुभारंभ श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांच्या अधिपत्याखाली प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी बोलताना प्रथमेश इंगळे यांनी ज्योतिषाचार्य कै.मल्लिनाथ स्वामी यांच्या सेवाभावी वृत्तीने प्रेरित होऊन त्यांच्या स्नुषा डॉ.स्वरूपा स्वामी यांनी गोरगरीब रुग्णांना आधुनिक पद्धतीच्या दंतचिकित्सा या अल्प दरात अक्कलकोट सारख्या ठिकाणी देण्याचा मानस बाळगून या स्वामी डेंटल केअरची स्थापना केलेली आहे. त्यांच्या या वैद्यकीय सेवेस श्री स्वामी समर्थांचे आशीर्वाद म्हणून स्वामींचे कृपावस्त्र व प्रतिमा तसेच आमच्या शुभेच्छा देऊन सन्मान केले असल्याचे मनोगत व्यक्त केले. यावेळी डॉ.स्वरूपा स्वामी, निलेश स्वामी, चन्ना विभुते, दर्शन घाटगे, तुषार मोरे, धनराज स्वामी, श्रीशैल गवंडी, श्रीकांत मलवे, खाजप्पा झंपले, विपुल जाधव, इत्यादी उपस्थित होते.
--------------------------------------▪️जनता संघर्ष न्यूज,सोलापूर▪️सिध्दार्थ भडकुंबे-संपादक
Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240