कै. सुधामती शिरसट यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विद्यार्थ्यांना दप्तर व लेखनसाहित्य वाटप.
प्रतिनिधी -सोलापूर
मनपा मुलांची मराठी केंद्र शाळा क्रमांक ९ येथे झोन क्र. ७ चे आरोग्य निरीक्षक श्री. शेषराव शिरसट यांच्या मातोश्री कै. सुधामती लिंबाजी शिरसट यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विद्यार्थ्यांना दप्तर व लेखनसाहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

या कार्यक्रमास नगरसेवक श्री. आसिफ शेख व सौ. वहिदाबी शेख, श्री. व सौ. शिरसट, श्री. भालचंद्र साखरे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे महत्त्व पटवून देत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षिका सौ. धानेश्वरी चौगुले यांनी केले, तर प्रास्ताविक मुख्याध्यापिका सौ. पंचशीला कांबळे यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी श्री. शहाबाज काझी यांनी आभार प्रदर्शन केले.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ. हेमलता देवानपल्ली, सौ. अनुसया सुरवसे आणि श्री. संतोष काकडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
----------------------------------------
🔹 जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
🔹संपादक- सिद्धार्थ भडकुंबे
🔹 बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579838240

Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240