मार्डी येथे शिवसेनेच्या वतीने 50 टक्के सवलतीच्या दरात शिलाई मशीन वाटप; सौ. उमा नागेश अकोलकर यांचीशिवसेना पक्ष माळी समाज क्रांतीसेना सोलापूर महिला ओबीसी जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती.
शिवसेना पक्षाच्या वतीने मारडी (ता. उत्तर सोलापूर, जि. सोलापूर) येथे 50 टक्के सवलतीच्या दरात शिलाई मशीन वाटप कार्यक्रम उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब, खासदार मा. ज्योतीताई वाघमारे यांच्या आशीर्वादाने तसेच सोलापूरचे मा. श्री. रमेश बारस्कर साहेब, शिवसेना पक्ष, माळी समाज क्रांती सेना महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष मा. श्री. राजकुमार हिवरकर पाटील साहेब आणि शिवसेना ओबीसी विभागाचे जिल्हाप्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला.
यावेळी सौ. उमा नागेश अकोलकर माळी यांची शिवसेना पक्ष माळी समाज क्रांतीसेना सोलापूर महिला ओबीसी जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीबद्दल उपस्थित मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमास मा. श्री. बळीराम काका साठे, बाबांना अण्णा पाटील, प्रल्हाद भैय्या काशीद, शशिकांत मार्तंडे, सुवर्णा झाडे, श्रीकांत मार्तंडे, महेश मुडके, बबन माळी, लक्ष्मण राठोड, नंदकुमार गवळी, नागेश अकोलकर, अनंता अकोलकर, योगेश माळी (तालुकाप्रमुख, ओबीसी, उत्तर सोलापूर), भीमराव भुसनर पाटील (ओबीसी महासंघ प्रदेश प्रमुख), दादासाहेब लोखंडे (जिल्हा उपप्रमुख, शिवसेना), तानाजीराव भोळे पाटील (तालुका प्रमुख, माळशिरस), तानाजीराव साठे (प्रदेश संघटक, शिवसेना), बापूसाहेब लोखंडे (जिल्हा संघटक, शिवसेना), शिवदत्त मोरे पाटील (विद्यार्थी सेना, शिवसेना), सुरेश करचे (युवा सेना जिल्हाप्रमुख) तसेच महेश पवार (शिवसेना शहर, अकलूज) यांची प्रमुख उपस्थिती होती.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. समाजातील गरजू महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.
-------------------------------------
🔹 जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
🔹संपादक- सिद्धार्थ भडकुंबे
🔹 बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579838240





Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240