त्रिमूर्ती गणेश मंडळ, मुस्ती येथे गणेशपूजन सोहळा उत्साहात-पूजेचा मान उळे गावचे उपसरपंच तथा सह्याद्री फाउंडेशन अध्यक्ष नेताजी(भाऊ) खंडागळे यांना.

प्रतिनिधी-सोलापूर
दि.1सप्टेंबर, 2025 रोजी त्रिमूर्ती गणेश मंडळ मुस्ती येथे गणेशपूजन सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला. यावेळी गणपती बप्पांच्या पूजेचा मान उळे गावचे उपसरपंच तथा सह्याद्री फाउंडेशन अध्यक्ष नेताजी(भाऊ) खंडागळे यांना देण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मंडळाच्या वतीने नेताजी(भाऊ)खंडागळे यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर त्यांच्या हस्ते छोट्या मुला-मुलींनी सादर केलेल्या टाळवादन व नृत्यप्रदर्शनाचे उद्घाटन झाले. या सादरीकरणामुळे कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली.
यानंतर श्रींची आरती संपन्न झाली. कार्यक्रमाला त्रिमूर्ती गणेश मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
----------------------------------------
🔹जनता संगर्ष न्यूज, सोलापूर 
▪️संपादक -सिद्धार्थ भडकुंबे 

Comments

Popular posts from this blog

करजगी येथे श्री १०८ ष.ब्र.शिव सोमनाथ शिवाचार्य महास्वामीजी संस्थान हिरेमठ संस्थान मठाच्या मठाधिपतींचा भव्य पट्टाधिकार व पट्टाभिषेक सोहळा उत्साहात संपन्न.

संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त आपदा मित्र-सखींकडून स्वच्छता मोहीम

दुधनीतील बौध्द समाजांनी जे कामे सुचवतील त्या कामांना प्राधान्य देणार-अप्पु परमशेट्टी.