ज्येष्ठ नागरिक संघातर्फे आज शाहीर रमेश खाडे यांचा पोवाड्याचा कार्यक्रम.

ज्येष्ठ नागरिक संघातर्फे आज शाहीर रमेश खाडे यांचा पोवाड्याचा कार्यक्रम.
प्रतिनिधी-सोलापूर 
ज्येष्ठ नागरिक संघ बंथनाळ मठ जुळे सोलापूर यांच्या वतीने रविवार दिनांक २९ सप्टेंबर २०२४ रोजी अॅड. सोमनाथ वैद्य यांच्या सौजन्याने शाहीर रमेश खाडे व सहकारी यांचा सोलापूरचा स्वातंत्र्य संग्राम म्हणजेच (सोलापूरचा मार्शल लॉ) या विषयावर पोवाड्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य ए.डी. जोशी असून, सदर कार्यक्रम इंडियन मॉडेल स्कूल, जुळे सोलापूर येथे सायंकाळी ५.३० वाजता सुरू होणार आहे. तरी सर्व ज्येष्ठ नागरिक बंधूभगिनींनी व परिसरातील नागरिकांनी सदर कार्यक्रमास वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन संघाचे नुतन अध्यक्ष सिद्राम सनके आणि इतर पदाधिकारी यांनी केले आहे.
--------------------------------------
▪️जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
▪️सिध्दार्थ भडकुंबे-संपादक
👉बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०

Comments

Popular posts from this blog

करजगी येथे श्री १०८ ष.ब्र.शिव सोमनाथ शिवाचार्य महास्वामीजी संस्थान हिरेमठ संस्थान मठाच्या मठाधिपतींचा भव्य पट्टाधिकार व पट्टाभिषेक सोहळा उत्साहात संपन्न.

संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त आपदा मित्र-सखींकडून स्वच्छता मोहीम

दुधनीतील बौध्द समाजांनी जे कामे सुचवतील त्या कामांना प्राधान्य देणार-अप्पु परमशेट्टी.