नित्यार्थ आरोग्यवर्धिनी कर्मचार्यांचे पगार वेळेवर करण्यात यावे-सैदप्पा झळकी.

प्रतिनिधी-अक्कलकोट
सोलापूर जिल्ह्यातील नित्यार्थ आरोग्यवर्धिनी चे पगार वेळेवर करण्यात यावे अशी मागणी रिपाइंचे जिल्हा उपाध्यक्ष सैदप्पा झळकी यांनी केली आहे.

काल सैदप्पा झळकी यांनी जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद आणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा ओव्हाळ यांना निवेदनादन  देवून त्यात नमूद केली आहे की,संपूर्ण जिल्यातील नित्यार्थ आरोग्य वर्धिनी कर्मचारी यांच्या गेल्या पाच महिन्यापासून पगार नाही.संपूर्ण महाराष्ट्रात आरोग्य वर्धिनी कर्म चार्यांचे पगार झाली असून फक्त सोलापूर जिल्यातील कर्मचार्यांचे पगार झाली नाही.गेल्या मार्च महिन्या पासून काम करत आहे.जिल्ह्यातील अनेक ठिकाणी नवीन कर्मचारी नियुक्ती करुन वैद्यकीय केंद्रे स्थापन करण्यात आली आहे.तरी आजतागायत नियुक्त केलेल्या कर्मचारी यांच्या पगार झाली नाही.
   आपण वरिष्ठ अधिकारी या प्रकरणात जातीने लक्ष घालून पगार होण्या कामी सहकार्य करावे.अन्यथा रिपाइं(आठवले गट)च्या वतीने आंदोलन छेडण्याच्या इशारा सैदप्पा झळकी यांनी केली आहे.या निवेदनाच्या प्रति,आरोग्यमंत्री महाराष्ट्र, डां.रामदास आठवले.सामाजिक न्याय राज्यमंत्री भारत सरकार आणी जिल्हाधिकारी सोलापूर यांना पाठवण्यात आली आहे.
--------------------------------------
▪️जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
▪️सिध्दार्थ भडकुंबे-संपादक
👉बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०

Comments

Popular posts from this blog

इफ्तार पार्टी म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक' इफ्तार पार्टीत घडले एकात्मतेचे प्रतीक मराठा सेवा संघाचा पुढाकार.

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी सलगर शाळेत नवागतांचा प्रवेशोत्सव संपन्न...

सोलापूर महानगरपालिकेचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. वाय. एच. पलोलू यांना पुन्हा म.न.पा सेवेत फेर नियुक्ती देण्याकरिता सोलापूरचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांना निवेदन सादर