सोलापूरच्या जिल्हा सरकारी वकील यांचा पुण्यातील पोलीस आयुक्तांच्या हस्ते सन्मान.

प्रतिनिधी - जनता संघर्ष न्यूज,सोलापूर इंडियन ह्यूमन राइट्स कौन्सिल यांच्यावतीने पुण्यातील गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स या ठिकाणी दिनांक २७ /७/२०२४ रोजी सोलापुरातील जिल्हा सरकारी वकील ॲड. प्रदीप सिंग राजपूत यांनी सुमारे शंभर पेक्षा जास्त आरोपींना जन्मठेपेची शिक्षा तर दोन आरोपींना फाशीच्या शिक्षा मिळवून१०० पेक्षा जास्त कुटुंबांना न्याय मिळवून दिल्याने त्यांचा विशेष सत्कार आणि सन्मान पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते करण्यात आला.सदर कार्यक्रमास माजी जिल्हा व सत्र न्यायाधीश आंबेकर आणि पुण्यातील प्रसिद्ध फौजदारी वकील एडवोकेट जैन एस. के. यांची सदर कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती होती.सदर सत्काराच्या कार्यक्रमानंतर नवीन होऊ घातलेल्या कायद्यांवर म्हणजेच भारतीय नागरिक सुरक्षा संहिता भारतीय न्याय संहिता , आणि भारतीय साक्ष अधिनियम या तिन्ही विषयांवर चर्चासत्राचे देखील आयोजन आयोजकांच्या वतीने करण्यात आले होते. सदर चर्चा सत्रा मध्ये पुण्याचे पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार यांनी पोलीस प्रशासनाची बाजू सदर नवीन कायद्याला अनुसरून मांडली तर सोलापूरचे जिल्हा सरकारी वकील ॲड. प्रदीप सिंह राजपूत य...