बंदलगी बंधारा दुरुस्त करण्याची माजी सभापती अशोक देवकते यांची मागणी.
बंदलगी बंधारा दुरुस्त करण्याची माजी सभापती अशोक देवकते यांची मागणी.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील बंदलगी-चिंचोळी बंधारा नादुरुस्त झाल्यामुळे धोकादायक अवस्थेत आहे.यामुळे पाण्याची गळती सुरू असल्याने बंधाऱ्यावरील औराद, बोळकवठा,राजूर,संजवाड, बंकलगी, सिंदखेड आदी गावातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. पाटबंधारे विभागाने बंधाऱ्यांची दुरुस्ती करून संबंधित गावातील शेतकऱ्यांना दिलासा द्यावा तसेच त्वरित बंधाऱ्यांच्या खराब झालेल्या प्लेट बदलून नवीन प्लेट बसून पाण्याची गळती तात्काळ बंद करावी,असे सर्व शेतकऱ्यांच्या वतीने माजी सभापती अशोक देवकते यांनी पाटबंधारे खात्याला रीतसर निवेदन दिले आहे.
----------------------------------
▪️जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
▪️सिध्दार्थ भडकुंबे-संपादक
👉बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०
Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240