श्री गजानन महाराज मंदिर सोरेगाव येथे पारायण कक्षाचा भूमीपूजन सोहळा संपन्न.

श्री गजानन महाराज मंदिर सोरेगाव येथे पारायण कक्षाचा भूमीपूजन सोहळा संपन्न.
प्रतिनिधी-जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
सोरेगाव येथील श्री गजानन महाराज मंदिर परिसरात बांधकाम कृती आराखडा प्रमाणे पारायणकक्ष बांधकामाचा भूमिपूजन सोहळा आज मोठ्या थाटामाटात आणि धार्मिक उत्साहात पार पडला. सौ.वश्री नारायण जोशी, श्री गजानन महाराज (श्री) सांस्कृतिक मंडळाचे कोषाध्यक्ष यांच्या शुभ हस्ते पारायण कक्ष, व त्याच बरोबर राम लक्ष्मण सीतामाई आणि महादेव मंदिराचे भूमीपूजन सोहळा व हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी संत श्रेष्ठ गजानन महाराजांचा.आशीर्वाद मागून पांरपारिक विधी आणि प्रार्थना करुन सोहळा भक्तीभाव  वातावरणात पार पडला. 
अचिंत्य जगताप्रती कृती तुझी न कोणा कळे।।
असो खलही केवढा तव कृपे सुमार्गी वळे।।
उणे पुढती ये तुझ्या खचित रत्नचिंतामणी ।।
शिरी सतत माझीया वरदहस्त ठेवा झणी ।।

अशा साप्रंत कलीयुगामध्ये संत सेवा आणि त्यांची कृपा आपणा प्रापंचीकावर व्हावे सर्वांचे जीवन ज्ञानमय/भक्तीमय व्हावा या हेतूने पारायणकक्ष,राम लक्ष्मण सीतामाई आणि महादेव मंदिरामुळे मंदिरात आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्व वाढेल अशी मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश पाखरे यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी आनंद जाधव, विजय सिंगी.अविनाश माने,महेश कुलकर्णी, सुरेश बोरीकर,निर्मलाताई  पाखरे,शांता कन्नूरकर,शोभाताई पाटील, सुवर्णाताई बसवंती ,सुजाता बोरीकर,वंदना पतकी,जयश्री देव,लतिका बडे, द्रौपदी पाटील,
 व मंडळाचे कार्यवाह गुरुलिंग कन्नूरकर, विश्वस्त तुकाराम जाधव,विरेंद्र बसवंती  बांधकाम तज्ञ विलास गोकाक अजय बागलकोटे सह असंख्य गजानन भक्त गण व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-----------------------------------------
▪️जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
▪️सिध्दार्थ भडकुंबे-संपादक
👉बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०

Comments

Popular posts from this blog

इफ्तार पार्टी म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक' इफ्तार पार्टीत घडले एकात्मतेचे प्रतीक मराठा सेवा संघाचा पुढाकार.

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी सलगर शाळेत नवागतांचा प्रवेशोत्सव संपन्न...

सोलापूर महानगरपालिकेचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. वाय. एच. पलोलू यांना पुन्हा म.न.पा सेवेत फेर नियुक्ती देण्याकरिता सोलापूरचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांना निवेदन सादर