आषाढी वारीच्या प्रेरणेने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर ड्रीम फाउंडेशन आयोजित वारी करिअरची स्तुत्य उपक्रमास शाळा-महाविद्यालयाचा उत्तम प्रतिसाद.

आषाढी वारीच्या प्रेरणेने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर ड्रीम फाउंडेशन आयोजित वारी करिअरची स्तुत्य उपक्रमास शाळा-महाविद्यालयाचा उत्तम प्रतिसाद.



प्रतिनिधी-जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
आषाढी वारीच्या प्रेरणेने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर ड्रीम फाउंडेशन आयोजित वारी करिअरची स्तुत्य उपक्रमास सोलापूर शहर व ग्रामीण भागात विविध शाळा महाविद्यालयातून चांगला प्रतिसाद मिळत असून त्याचाच एक भाग म्हणून छत्रपती शिवाजी नाईट कॉलेज सोलापूर आयोजित वारी करिअरची "दिशा समृद्ध जीवनाची"या शैक्षणिक प्रबोधन पर युवा विकास दिंडीचे मंगळवारी दि. ९ जुलै २०२४ रोजी सदर दिंडीचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मधुकर पवार यांच्या हस्ते दिंडीचे स्वागत व ग्रंथ पूजन करण्यात आले.



यावेळी सदर ग्रंथ दिंडीच्या पुढील ९ दिवसांमध्ये होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा व उपक्रमाबद्दल राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ.युवराज सुरवसे यांनी रूपरेषा सांगितली.

वृक्षारोपण, समाज प्रबोधन व्याख्यान, व्यसनमुक्ती, सांस्कृतिक कार्यक्रम, पारंपारिक वेशभूषा आणि विविध दर्शनाच्या स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत.  यामध्ये प्रत्येक गावात, विद्यार्थी पालक, महिला शेतकरी यांना प्रबोधनपर अध्यात्मिक व सामाजिक जनजागृती अभियान अभिनव दिंडीतून देण्यात येणार आहेत याबद्दल माहिती सांगितली. या ग्रंथदिंडीमध्ये संतांचे ग्रंथ व त्यांच्या पादुका यावेळी ठेवण्यात आल्या होत्या या ग्रंथांचे व पादुकांचे पूजन करण्यात आले. 
   यावेळी महाविद्यालयातील  प्राचार्य डॉ मधुकर पवार, डॉ.अरुण मित्रगोत्री ,संतोष गवळी, डॉ.अरुण सोनकांबळे, डॉ अभिमन्यू ओहोळ , डॉ .नागेश गायकवाड  डॉ. राणी मोटे, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ. युवराज सुरवसे, डॉ.वाल्मीक कीर्तीकर  राजाभाऊ घंदुरे , शहाजी जाधव महेश डेंगळे, दत्ता भोसले,  संतोष अलकुंटे, केशव लोंढे , संजय थिटे यावेळी विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते करून विद्यार्थी मित्रांनी या ग्रंथदिंडीचे मोठ्या संख्येने स्वागत व या दिंडी रॅलीमध्ये सहभागी झालेले होते .
----------------------------------
▪️जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
▪️सिध्दार्थ भडकुंबे-संपादक
👉बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०

Comments

Popular posts from this blog

इफ्तार पार्टी म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक' इफ्तार पार्टीत घडले एकात्मतेचे प्रतीक मराठा सेवा संघाचा पुढाकार.

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी सलगर शाळेत नवागतांचा प्रवेशोत्सव संपन्न...

सोलापूर महानगरपालिकेचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. वाय. एच. पलोलू यांना पुन्हा म.न.पा सेवेत फेर नियुक्ती देण्याकरिता सोलापूरचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांना निवेदन सादर