सोलापूर शहरातील ट्राफिक पोलीस पाल्यांने मिळवली तीन गोल्ड मेडल-पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी केले कौतुक.


सोलापूर शहरातील ट्राफिक पोलीस पाल्यांने मिळवली तीन गोल्ड मेडल-पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी केले कौतुक.


प्रतिनिधी-सोलापूर 
सोलापूर शहर वाहतुक शाखेत कार्यरत असणारे पोलीस हवालदार/१९३ श्री राजेंद्र खाडे यांचा मुलगा रणवीर राजेंद्र खाडे, वय- १३ याने,जानेवारी २०२४ मध्ये दिल्ली येथे राष्ट्रीय अॅक्वेंटिक स्पर्धेत महाराष्ट्राच्या शालेय संघातून तीन सुवर्णपदके प्राप्त केली.तसेच दि. ०७ जुलै ते ११ जुलै २०२४ रोजी इंदौर (मध्यप्रदेश) येथे ४० व्या ज्युनिअर आणि ५० व्या ज्युनिअर नॅशनल अॅक्वेंटिक चॅम्पियनशिप पार पडली. यामध्ये रणवीर राजेंद्र खाडे याने तीन सुवर्णपदके मिळविली.सब ज्युनिअर गटामधून तीन मीटर स्प्रिंग बोर्ड, हाय बोर्ड व ०१ मीटर स्प्रिंग बोर्ड या तिन्ही प्रकारात त्याने सुवर्णपदक प्राप्त केले.  रणवीर राजेंद्र खाडे याने ०३ सुवर्णपदक जिंकल्याने महाराष्ट्र चॅम्पियनचा हकदार ठरलेला आहे. त्याला आंतररराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षक श्रीकांत शेटे यांचे मार्गदर्शन लाभले.रणवीर राजेंद्र खाडे हा इयत्ता ७ वी मध्ये बी.एफ. दमाणी प्रशालेमध्ये शिकत आहे.रणवीर राजेंद्र खाडे या मुलाच्या यशाबद्दल सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
----------------------------------
▪️जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
▪️सिध्दार्थ भडकुंबे-संपादक
👉बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०

Comments

Popular posts from this blog

इफ्तार पार्टी म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक' इफ्तार पार्टीत घडले एकात्मतेचे प्रतीक मराठा सेवा संघाचा पुढाकार.

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी सलगर शाळेत नवागतांचा प्रवेशोत्सव संपन्न...

सोलापूर महानगरपालिकेचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. वाय. एच. पलोलू यांना पुन्हा म.न.पा सेवेत फेर नियुक्ती देण्याकरिता सोलापूरचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांना निवेदन सादर