सोलापूरच्या जिल्हा सरकारी वकील यांचा पुण्यातील पोलीस आयुक्तांच्या हस्ते सन्मान.
प्रतिनिधी-जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
इंडियन ह्यूमन राइट्स कौन्सिल यांच्यावतीने पुण्यातील गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स या ठिकाणी दिनांक २७ /७/२०२४ रोजी सोलापुरातील जिल्हा सरकारी वकील ॲड.प्रदीप सिंग राजपूत यांनी सुमारे शंभर पेक्षा जास्त आरोपींना जन्मठेपेची शिक्षा तर दोन आरोपींना फाशीच्या शिक्षा मिळवून१०० पेक्षा जास्त कुटुंबांना न्याय मिळवून दिल्याने त्यांचा विशेष सत्कार आणि सन्मान पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते करण्यात आला.सदर कार्यक्रमास माजी जिल्हा व सत्र न्यायाधीश आंबेकर आणि पुण्यातील प्रसिद्ध फौजदारी वकील एडवोकेट जैन एस. के. यांची सदर कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती होती.सदर सत्काराच्या कार्यक्रमानंतर नवीन होऊ घातलेल्या कायद्यांवर म्हणजेच भारतीय नागरिक सुरक्षा संहिता भारतीय न्याय संहिता , आणि भारतीय साक्ष अधिनियम या तिन्ही विषयांवर चर्चासत्राचे देखील आयोजन आयोजकांच्या वतीने करण्यात आले होते. सदर चर्चा सत्रा मध्ये पुण्याचे पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार यांनी पोलीस प्रशासनाची बाजू सदर नवीन कायद्याला अनुसरून मांडली तर सोलापूरचे जिल्हा सरकारी वकील ॲड.प्रदीप सिंह राजपूत यांनी सरकार पक्षाच्या वतीने नवीन कायद्याला अनुसरून सरकार पक्षाची आणि सरकारी वकिलांनी भूमिका मांडली तर पुण्याचे प्रसिद्ध वकील एडवोकेट एस के जैन यांनी आरोपींच्या वतीने सदर नवीन कायद्याला अनुसरून त्यांची भूमिका मांडली त्याचबरोबर निवृत्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री आंबेकर यांनी न्यायाधीशांच्या भूमिकेतून सदर नवीन होऊ घातलेल्या कायद्यासंदर्भात आपली भूमिका मांडली . सदर चर्चा सत्रा नंतर प्रश्नोत्तराचा कार्यक्रम घेण्यात आला. सदर कार्यक्रमास उपस्थित जनसमुदायातून आणि वकील वर्गातून सदर नवीन कायद्यास आणि सद्य वस्तूस्थिती ला आणि परिस्थिती लाअनुसरून त्यांच्या मनात असलेल्या शंका बद्दल सर्व पॅनल सदस्यांनी विविध स्वरूपाचे प्रश्न विचारण्यात आले आणि त्याची उत्तरे तत्परतेने संबंधित पॅनलिस्ट यांनी दिली .सदर कार्यक्रमाचे आयोजन इंडियन ह्युमन राईट्स कौन्सिल यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केले होते. सदर कार्यक्रमाचे मुख्य संयोजक ॲड.आशिष सोनवणे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर सदर कार्यक्रमास पुणे अधिवक्ता परिषदेची सर्व पदाधिकारी तसेच धर्म जागरण विधी विभागाचे सर्व पदाधिकारी आणि पुण्यातील वकील वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली तर कार्यक्रमाची सांगता ही वंदे मातरम झाली. सदर कार्यक्रमा वेळी पुण्याचे पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार यांनी उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांना आवाहन केले की या अशा प्रकारचे चर्चासत्र वारंवार घडवून आणून कायद्याबाबत आणि लॉ अँड ऑर्डर बाबत जनजागृती करण्यात यावी त्यास संपूर्ण पोलीस प्रशासनाचे सहकार्य राहील सदरच्या आवाहनास अनुसरून उपस्थित जनसमुदायाकडून मोठ्या प्रमाणात दाद देण्यात आली आणि प्रश्र्न विचारण्यात आले तर संबंधितांनी अशा प्रकारचे चर्चासत्र वारंवार घडवून आणण्याचे आश्वासन सर्व उपस्थित पदाधिकाऱ्यांनी दिल.
----------------------------------
▪️जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
▪️सिध्दार्थ भडकुंबे-संपादक
👉बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०
Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240