क्रांतीवीर लहुजी शक्ती सेनेच्या वतीने गुणवत्त विद्याथ्य्याचा सत्कार समारंभ व शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न.

क्रांतीवीर  लहुजी शक्ती सेनेच्या वतीने गुणवत्त विद्याथ्य्याचा सत्कार समारंभ व शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न.


प्रतिनिधी-जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
क्रांतीवीर  लहुजी शक्ती सेना,  महाराष्ट्र राज्य शाखा सोलापूर तसेच क्रांतिवीर लहुजी वस्ताद तरुण मंडळ,  लष्कर, सोलापूर, अँरोस्ट्रक्चर सिव्हील यांच्या संयुक्त विद्यमाने सरकारी वकील प्रदीपसिंग राजपूत यांच्या कार्यकर्तृत्वाच्या सन्मानार्थ  '१०० जन्मठेपे बद्दल १००  सामाजिक उपक्रम' अंतर्गत  उपक्रम क्र. २ अर्थातच  गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ व शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम म.न.पा. कॅम्प शाळा , लष्कर, सोलापूर येथे संपन्न झाला.


   कार्यक्रमास  सदर बाजार पोलीस चौकीचे  वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे,जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंग राजपूत ड्रीम फाऊंडेशनचे काशिनाथ भतगुनकी, प्रा.दशरथ रसाळ,मुख्याध्यापक जगन्नाथ सज्जन, किशोर जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.




       कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सुरेश पाटोळे यांनी सांगितले की, 'दरवर्षी क्रांतिवीर लहुजी शक्ती सेने तर्फे समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम घेतला जातो. यावर्षी मात्र जिल्हा सरकारी वकील  प्रदीपसिंग राजपूत यांच्या  कार्यकर्तृत्वाचा परिचय विद्यार्थ्यांना व्हावा व त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांनी आपले भविष्य घडवावे म्हणून १०० जन्मठेप १०० सामाजिक उपक्रमा अंतर्गत  हा उपक्रम घेत आहोत.१०० जन्मठेपा मिळण्यासाठी यशस्वी युक्तिवाद करून  १०० कुटुंबांना न्याय मिळवून दिल्याबद्दल जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंग राजपूत यांचा विशेष सत्कार करण्यात आला.इयत्ता दहावी, बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न झाला. 
       वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की,'शैक्षणिक गुणवत्ते बरोबरच  विद्यार्थ्यांनी  खेळ,संगीत, अभिनय अशा विविध क्षेत्रात आपल्या आवडीनुसार करियर घडवावे. आपली परिस्थिती बदलण्यासाठी  कठोर परिश्रम घ्यावे.' 
जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंग राजपूत यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले की, या शाळेतील  गरीब, वंचित आणि  दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारची  शिकवणी  न लावता  दहावीच्या परीक्षेत ८६% टक्क्याच्या वरती गुण घेतलेले आहेत. ही खरोखरच अभिमानाची बाब आहे.शैक्षणिक यशा सोबत आपण सामाजिक भान जपले पाहिजे. आपल्यासाठी कष्ट घेणाऱ्या आई-वडिलांची सेवा केली पाहिजे. सन्मार्गाने जीवन जगून देश कार्यास हातभार लावला पाहिजे.' या शब्दात आपले मत व्यक्त केले. काशिनाथ भतगुनकी, प्रा. दशरथ रसाळ यांनी देखील आपले विचार व्यक्त केले.
      कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.कार्यक्रमास क्रांतिवीर लहुजी  वस्ताद तरुण मंडळाचे अध्यक्ष विकास जरिपटके, युवा नेते विश्वेश्वर गायकवाड,महेश जोगदंड, महेश तेजबिंदे, सिद्राम जरिपटके, अभिषेक हाटकर, अक्षय गायकवाड, समर्थ पाटोळे, आदित्य पारधे, अँड.कोळी, अँड. श्रीवास्तव,  गोकुळ कांबळे सर, शहाने सर, हंचाटे मँडम,अरकेरी सर, बिराजदार सर आदीची उपस्थिती होती. यावेळी  क्रांतिवीर लहुजी शक्ती सेनेचे पदाधिकारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर जाधव यांनी केले, तर आभार  शाळेचे मुख्याध्यापक  जगन्नाथ सज्जन यांनी मानले.
--------------------------------------
▪️जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
▪️सिध्दार्थ भडकुंबे-संपादक
👉बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०

 

Comments

Popular posts from this blog

इफ्तार पार्टी म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक' इफ्तार पार्टीत घडले एकात्मतेचे प्रतीक मराठा सेवा संघाचा पुढाकार.

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी सलगर शाळेत नवागतांचा प्रवेशोत्सव संपन्न...

सोलापूर महानगरपालिकेचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. वाय. एच. पलोलू यांना पुन्हा म.न.पा सेवेत फेर नियुक्ती देण्याकरिता सोलापूरचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांना निवेदन सादर