एम के फाऊंडेशनच्या शेतकरी पीक संवाद कार्यक्रमाचे आयोजन;शेतकरी हीत यातच माझा समाधान-महादेव कोगनुरे.

एम के फाऊंडेशनच्या शेतकरी पीक संवाद कार्यक्रमाचे आयोजन;शेतकरी हीत यातच माझा समाधान-महादेव कोगनुरे.
दक्षिण सोलापूर चिंचपूर व नवीन टाकळी येथे आयोजित केलेल्या शेतकरी पीक संवाद कार्यक्रमास संबोधित करताना महादेव कोगनुरे.


प्रतिनिधी-सोलापूर
गेल्या अनेक वर्षांपासून शेतकर्यांच्या प्रशनाकडे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे.आज ही शेतकर्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत.शेतकर्यांच्या हितासाठी कोणीच पुढे येताना दिसून येत नाही.यासाठीच मी कृषि मेळावा, शेतकरी कार्यशाळा,शेतकरी पीक संवाद कार्यक्रम हाती घेतला आहे.कारण मला शेतकर्यांचे हीत यातच मला समाधान मिळत असल्याचे प्रतिपादन एम के फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे यांनी येथे बोलताना  केले.

दक्षिण सोलापूर चिंचपूर व नवीन टाकळी येथे एम के फाउंडेशन च्या वतीने शेतकरी पीक संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळी शेतकरी पीक संवाद कार्यक्रमास संबोधित करताना महादेव कोगनुरे हे बोलत होते.यावेळी दक्षिण सोलापूर तालुक्यातील गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी शेतकरी पीक संवाद कार्यक्रमात शेतकऱ्यांची विविध समस्या जाणून घेतल्या.यावेळी शेतकरी बांधवांनी पिकांवर येणारे विविध रोग, अवर्षण, अडचणी, भारनियमन, सिंचन सुविधाबाबत विचार मांडले.त्यानंतर शेतकर्‍यांची मार्गदर्शन व चर्चा पार पडली.या शेतकरी पीक संवाद कार्यक्रमास शेतकर्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता.

तसेच यावेळी आधुनिक पद्धतीने शेती कशी करावी,पंचसूत्रांचा वापर करून एकरी शंभर टन ऊस उत्पादन कसे काढावे अशा विविध विषयावर शेतकर्यांना यावेळी मार्गदर्शन करण्यात आले.या शेतकरी पीक संवाद कार्यक्रमास सोमेश पदमाळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. आज पर्यंत एम के फाउंडेशन च्या माध्यमातून विविध समाजोपयोगी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. नेहमीच समाजातील युवक,महिला व शेतकरी अशा विविध घटकांना आधार देण्याचे काम महादेव कोगनुरे हे करताना दिसतात.आज पुन्हा एकदा महादेव कोगनुरे यांनी शेतकरी पीक संवाद कार्यक्रम आयोजित करून शेतकर्यांना दिलासा देण्याचे काम केले आहे.भविष्यात देखील समाजातील प्रत्येक घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे महादेव कोगनुरे यांनी सांगितले.यावेळी चिंचपूरचे सरपंच संगप्पा हत्तरसंग, टाकळी चे उपसरपंच सिद्धाराम घोडके ,ग्रामपंचायत सदस्य सुभाष बगले,परशुराम घोडके,अंबादास पाटील, श्याम म्हेत्रे मल्लिकार्जुन बगले ,गणेश बिराजदार, आमोगसिद्ध पाटील,मल्लिकार्जुन बिराजदार ,यल्लप्पा दिवटे, फाउंडेशनचे सहकारी स्वप्नील व्हटकर,गंगाधर हत्तरसंग,अब्दुलरजाक कडपे, अप्पू बगले, बल्लाप्पा चडचण, भीमाशंकर चडचण, अप्पू बगले, गुरुनाथ चडचण, वीरू कोणदे,चंदू चडचण व बहुसंख्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
----------------------------------
▪️जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
▪️सिध्दार्थ भडकुंबे-संपादक
👉बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०





Comments

Popular posts from this blog

इफ्तार पार्टी म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक' इफ्तार पार्टीत घडले एकात्मतेचे प्रतीक मराठा सेवा संघाचा पुढाकार.

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी सलगर शाळेत नवागतांचा प्रवेशोत्सव संपन्न...

सोलापूर महानगरपालिकेचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. वाय. एच. पलोलू यांना पुन्हा म.न.पा सेवेत फेर नियुक्ती देण्याकरिता सोलापूरचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांना निवेदन सादर