नगरपालिका मुलां-मुलींची शाळ नं-१ मध्ये विध्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप.
नगरपालिका मुलां-मुलींची शाळ नं-१ मध्ये विध्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप.
प्रतिनिधी-जनता संघर्ष न्यूज,अक्कलकोट
अक्कलकोट येथील नगरपालिका मुलां- मुलींची मराठी शाळा नं १ मधील सर्व विध्यार्थ्यांना वही, पेन आणि शासनातर्फे मिळालेल्या पाठयपुस्तकांचे वाटप मुख्याध्यापिका वर्षा तडकलकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.कार्क्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवास्थापन समीतीचे अध्यक्ष सलीम शेख होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी क्रांतीज्योति सवित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून सलीम शेख यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.तद्नंतर इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी आलेल्या विध्यार्थी आणि पालकांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. विध्यार्थ्यांची नाव नोंदणी करून घेण्यात आली.उपस्थित विध्यार्थांचे मनोरंजनात्मक खेळ घेण्यात आले. खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परमेश्वर भालेकर,इस्माईल जमादार, महेश हंचाटे,सुभाष सुरवसे, सुषमा हंचाटे, राजेंद्र मोहोळकर,उमाकांत मोरे, प्रवीण साठे आदी शिक्षकांनी परिश्रम घेतले.
----------------------------------
▪️जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
▪️सिध्दार्थ भडकुंबे-संपादक
👉बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०
Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240