कामगार नेते अशोक जानराव व सरोजनीताई जानराव यांचा विवाह वर्धापनदिन विशेष उपक्रमाने साजरा.

कामगार नेते अशोक जानराव व सरोजनीताई जानराव यांचा विवाह वर्धापनदिन विशेष उपक्रमाने साजरा. 


प्रतिनिधी-सोलापूर
डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यान माॅर्निंग ग्रुपच्या वतीने आज सरोजनीताई व अशोक जानराव (कामगार नेते व माजी नगरसेवक) यांच्या लग्नाचा ४८ वा वाढदिवस त्यांच्या सत्कार सोहळ्यासह एका आगळ्या-वेगळ्या उपक्रमाने साजरा करण्यात आला. 
         लघुउद्योग मार्गदर्शिका मुरुमकर मॅडम यांनी महिलांना छोट्या-छोट्या उद्योगांविषयी माहिती देऊन, बहुजन विचार मंच, सोलापूर संचलित विविध बचत गटातील महिलांना प्रेरणा दिली. यावेळी जीवन प्राधिकरण, सोलापूर येथील सेवानिवृत्त अभियंता तथा, शाहीर श्री. रमेश खाडे साहेब यांनीही मार्गदर्शन करताना, श्रोत्यांच्या अग्रहास्तव भीमगीत गाऊन कार्यक्रमात ऊर्जा निर्माण केली.
         यावेळी बहुजन विचार मंचचे शाम शिंगे सर, समता सैनिक दलाचे केरु जाधव साहेब, चित्तरंजन सातपुते, बंडू कांबळे, बौद्धाचार्य सुमेध डोलारे, धम्मरक्षिता कांबळे, मुक्ताताई बनसोडे, मिनाक्षी बनसोडे यांनीही उद्बोधक मनोगते व्यक्त करताना, जानराव दाम्पत्याने केलेल्या सामाजिक कार्याचा आढावा सादर करून, त्यांना दीर्घायुष्य लाभण्यासाठी मंगलकामना केली. तसेच, श्री. अशोक व सौ. सरोजनीताई जानराव यांनीही वैवाहिक जीवनात केलेल्या कौटुंबिक व सामाजिक कार्यामुळे समाजात मिळत असलेल्या मान-सन्मानांचा उल्लेख करून, समाजाप्रति ऋण व्यक्त केले. 
         या कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी मालिनी दोड्यानुर, मंदाकिनी शिंगे, मंगल दोड्यानुर, मनिषा सरवदे, कल्पना सुर्वे, सुजाता कांबळे आदि बचत गटाच्या महिलांनी विशेष परिश्रम घेतले.
-----------------------------------------
▪️जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
▪️सिध्दार्थ भडकुंबे-संपादक
👉बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०



Comments

Popular posts from this blog

इफ्तार पार्टी म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक' इफ्तार पार्टीत घडले एकात्मतेचे प्रतीक मराठा सेवा संघाचा पुढाकार.

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी सलगर शाळेत नवागतांचा प्रवेशोत्सव संपन्न...

सोलापूर महानगरपालिकेचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. वाय. एच. पलोलू यांना पुन्हा म.न.पा सेवेत फेर नियुक्ती देण्याकरिता सोलापूरचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांना निवेदन सादर