उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व एम के फाउंडेशन चे महादेव कोगनुरे यांच्यात सोलापूर येथे बंद दाराआड राजकीय वर्तुळात चर्चा...!कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व एम के फाउंडेशन चे महादेव कोगनुरे यांच्यात सोलापूर येथे बंद दाराआड राजकीय वर्तुळात चर्चा...!कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व एम के फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष तथा सागर सिमेंट चे मुख्य व्यवस्थापक महादेव कोगनुरे यांच्यात सोलापूर येथे बंद दाराआड बराच वेळ राजकीय चर्चा झाल्याचे सोशल मिडीयावरुन चर्चा होताना दिसून येत आहे.यामुळे महादेव कोगनुरे हे भाजपात प्रवेश करणार की काय ? याची चर्चा आज सकाळपासूनच एम के फाउंडेशन च्या कार्यकर्त्यांतून सुरु आहे.या चर्चेमुळे महादेव कोगनुरे यांच्या कार्यकर्त्यांचा उत्साह मात्र अधिकच वाढला आहे.कारण गेल्या अनेक दिवसांपासून महादेव कोगनुरे यांच्या भुमिकेकडे संपूर्ण दक्षिण सोलापूर तालुक्याचे लक्ष लागून राहिले होते की,महादेव कोगनुरे हे काय भुमिका घेणार याची उत्सुकता कार्यकर्त्यांमधून होती.आज देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांची सोलापूर पार्क स्टेडियमवर जाहीरसभा असल्याने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस सोलापूर येथे आले असता तेव्हा महादेव कोगनुरे व देवेंद्रजी फडणवीस यांच्यात बंद दाराआड बराच वेळ राजकीय चर्चा झाल्याने आता महादेव कोगनुरे भाजपात जाणार की काय ? याची चर्चा आज दिवसभर सोशल मिडीयावरुन होताना पहायला मिळत आहे.कारण मागच्याच आठवड्यात सोलापूर लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार प्रणितीताई शिंदे व महायुतीचे उमेदवार आमदार रामभाऊ सातपुते या दोघांनीही महादेव कोगनुरे यांच्या घरी जाऊन सदिच्छा भेट घेतली होती.यामुळे महादेव कोगनुरे हे काय भुमिका घेणार याची उत्सुकता कार्यकर्त्यांना लागून राहिली होती.आज पुन्हा एकदा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व महादेव कोगनुरे यांच्यात बंद दाराआड राजकीय चर्चेने एम के फाउंडेशन च्या कार्यकर्त्यांचा उत्साह पुन्हा एकदा शिगेला पोहचला आहे.
-----------------------------------------
▪️जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
▪️सिध्दार्थ भडकुंबे-संपादक
👉बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४९
Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240