मीपणाचा अहंकार नष्ट करून मन स्वामीभक्तीत रमवावं - जिल्हाधिकारी दिलीप स्वामी.

प्रतिनिधी-अक्कलकोट
गुरूंचे नामस्मरण, देवाचे दर्शन हे पुण्यकर्म आहे. मन एकाग्र करून स्वामीनाम घेत राहिल्याने आत्मिक सुखाची प्राप्ती होते.
श्री स्वामी समर्थ हे गुरूंचे गुरु असून गुरु हे नेहमीच मार्गदर्शक असतात. त्यांचे नामस्मरण केल्याने जीवन मुक्ती प्राप्त होते. म्हणून जीवनात गुरूंचे स्मरण विशेष महत्त्वाचे आहे. या माध्यमातून गुरुकृपेची प्रचिती येते. यामुळे माणसा-माणसांच्या मनामध्ये प्रेम, दयाभाव निर्माण होऊन सद्गुरुकृपेची स्वामी कृपेची प्राप्ती होते. यामुळे शिष्य साधकाचे भक्तांचे जीवन सुवर्णमय होऊन जाते. कारण ब्रम्हांडनायक सद्गुरु स्वामींना समजल्याने जीवनात मीपणाचा अहंकार नष्ट होतो. हा अहंकार नष्ट झाल्याने मानवाचे मन परमार्थाकडे, भक्तीकडे वळते. त्यामुळं मीपणाचा अहंकार नष्ट करून मन स्वामीभक्तीत रमवावं असे मनोगत सोलापूर जिल्हा परिषदेचे गतकालीन मुख्य कार्यकारी अधिकारी व संभाजी नगरचे विद्यमान जिल्हाधिकारी आय.ए.एस.दिलीप स्वामी यांनी व्यक्त केले.
ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास सहकुटुंब भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचा श्री.स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. याप्रसंगी जिल्हाधिकारी स्वामी बोलत होते. पुढे बोलताना जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी श्री स्वामी समर्थांनी अनेक लीला दाखवून अनेकांचे दुख नाहीसे केले. आपल्या सारख्या संसारिक माणसांनी स्वामी भक्ती करत स्वार्थ-परमार्थ दोन्हीचे संतुलन साधल्यास स्वामी कृपेची प्रचिती नक्कीच येते. 'भक्तां देसी धनसंपत्ती दूर सारी व्याधी उपाधी' असे भक्तांचे रक्षण करणारे गुरु म्हणजे स्वामी समर्थ. त्यांची सेवा अनन्यभावे करा. नामस्मरण करत रहा. यातच जीवनाचे सौख्य सामावले आहे. नामस्मरणात तल्लीन होणे हीच भक्ती श्रेष्ठ आहे, ती आत्मसात करा. असेही विवेचन दिलीप स्वामी असेही मनोगत स्वामी यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, पुरोहित मोहनराव पुजारी, संजय पवार, गिरीश पवार, विपुल जाधव, रवी मलवे, श्रीशैल गवंडी, श्रीकांत मलवे, प्रसाद सोनार, स्वामीनाथ लोणारी, काशिनाथ इंडे, रविराव महिंद्रकर आदींसह स्वामी कुटूंबीय उपस्थित होते.
-----------------------------------------
Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240