स्वामी कृपेचे ऋणी असल्याने कुटुंबासमवेत स्वामी चरणी नतमस्तक -आदेश बांदेकर
प्रतिनिधी - अक्कलकोट
माझ्या व माझ्या कुटुंबीयांच्या छत्रछायेवर स्वामी समर्थांची मोठी कृपा आहे. श्री स्वामी समर्थांच्या कृपेचे आम्ही सर्व कुटुंबीय ऋणी आहोत, त्यामुळे कुटुंबासमवेत स्वामींच्या चरणी नतमस्तक झालो असल्याचे मनोगत प्रसिद्ध मराठी सिनेमा व नाट्य कलाकार आदेश बांदेकर यांनी व्यक्त केले. ते नुकतेच श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांनी आदेश बांदेकर यांचा स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन सन्मान केला. यावेळी बोलताना आदेश बांदेकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, संपतराव शिंदे, श्रीशैल गवंडी, गिरीश पवार, प्रसाद सोनार, श्रीकांत मलवे, अविनाश क्षीरसागर, सागर गोंडाळ, प्रसाद पवार, मनोज कामनूरकर, विपूल जाधव आदींसह बांदेकर कुटुंबीय व स्वामी भक्त उपस्थित होते.
--------------------------------------
▪️जनता संघर्ष न्यूज ▪️संपादक-सिध्दार्थ भडकुंबे
▪️बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०
▪️बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०
Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240