गुरववाडी गावचे विकासरत्न तथा सरपंच म्हाळप्पा पुजारी यांची स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनेल कार्यालयास सदिच्छा भेट.
प्रतिनिधी- सोलापूर
अक्कलकोट तालुक्यातील गुरववाडी गावचे विकासरत्न तथा सरपंच म्हाळप्पा पुजारी यांनी स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनेलच्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली.तसेच श्री गणेशाच्या प्रतिमेचे पूजन सरपंच म्हाळप्पा पुजारी यांच्या हस्ते करण्यात आले सदर प्रसंगी स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनेलचे संपादक वाघ साहेब यांच्या शुभहस्ते सरपंच म्हाळप्पा पुजारी यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.यावेळी म्हाळप्पा पुजारी यांनी स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनेलच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी सारा न्यूज नेटवर्क चे संपादक तथा पत्रकार सुरक्षा समितीचे सोलापूर शहराध्यक्ष राम हुंडारे, जी.के मागासवर्गीय बहुउद्देशीय संशोधन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष (दादा)गायकवाड,सिध्दार्थ भडकुंबे आदी उपस्थित होते.
------------------------------------
Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240