नाशिक येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ.मनीषा(ताई)वसंत देसले यांचा शिवसेनेत प्रवेश.
![]() |
सामाजिक कार्यकत्यां सौ.मनीषा(ताई)वसंत देसले यांना शिवबंधन बांधताना मा.उद्धव बाळासाहेब ठाकरे. |
प्रतिनिधी- मुंबई
दि.१६ सप्टेंबर,२०२३ रोजी ठाकरे घराण्याचे निवासस्थान असलेल्या वांद्रे मुंबई येथील मातोश्री निवासस्थानी नाशिक येथील सामाजिक कार्यकत्यां सौ.मनीषा वसंत देसले यांनी सदिच्छा भेट देऊन मा.उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्या हस्ते शिवबंधन बांधून घेऊन शिवसेनेत प्रवेश केला.तसेच पक्ष बांधणीसाठी निश्चितच तळागाळातील जनतेपर्यंत शिवसेनचे विचार पोहचण्याचा प्रयत्न करीन असे अभिवचनही आदरणीय पक्ष प्रमुखांना दिले.
यावेळी शिवसेनेचे जेष्ठनेते मा. सुभाषजी देसाई,खासदार अरविंद सावंत ,संपर्क प्रमुख धात्रक उत्तर महाराष्ट्र महिला संपर्क प्रमुख धात्रक सर,सौ.शुभांगी(ताई) पाटील,धुळे जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, ग्रामीण जिल्हा प्रमुख हेमंत साळुंखे,ग्रामीणचे माजी आमदार प्रा.शरद पाटील,धुळे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष हेमंत साळुंखे,किरण भाऊ हिलाल,डॉ.सुशीलजी महाजन,
साक्री येथील उपसभापती सौ.देसले ताई,युवती संघटक कु.प्रियंका जोशी डॉ.सुशील महाजन आदि मान्यवर उपस्थित होते.
------------------------------------
Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240