दक्षिण सोलापूरचे जन-नायक महादेव कोगनुरे....

जन-नायक महादेव कोगनुरे....
प्रतिनिधी-सोलापूर
घरात कोणत्याही प्रकारचा राजकारणाचा वसा नसताना,भक्कम आर्थिक पाठबळ नसताना, प्रस्थापित सत्तेला सुरुंग लावणं सोपं नाही. पण ही सत्ताबदलाची किमया करण्यासाठी दक्षिण सोलापूर मतदारसंघातून आगामी विधानसभा महादेव कोगनुरे लढणार आहेत.लोकशाहीच्या मंदिरात सर्वोभौमत्त्वाची पूजा बांधावी हा विचार घेऊन महादेव कोगणुरे हे विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहेत. काही वर्षांपासून सामाजिक जाणिवांचा वसा घेऊन निस्वार्थीपणे वंचित, दुर्बल, गोर-गरिबांसाठी काम करणारा, त्यांच्या सुखदुःखात धावून जाणाऱ्या महादेव कोगनुरे यांनी समाजभान जपत राजकीय क्षेत्रातही दमदार प्रवेश केला आहे.
वाचनाची, लिखाणाची, वक्तृत्वाची आवड असल्याने अवती-भवतीच्या घटनांचा वेध ते विविध माध्यमातून टिपत असतात शिवाय सामाजिक परिस्थितीविषयी त्यांच्या जाणिवा प्रगल्भ आहेत. महादेव कोगनुरे यांचे संघटन कौशल्य त्यांच्या नेतृत्वगुणांच्या उद्याचा हुंकार ठरणार आहे.दक्षिण तालुक्यात युवकांचं संघटन करून आपला तालुका आदर्श कसा करता येईल, या विचाराने गावातील तरुणांच्या साथीने एम. के. फाऊंडेशनची स्थापना झाली. आणि खऱ्या अर्थाने  विकासात्मक कार्याला सुरुवात केली.मतदारसंघाच्या विकासासाठी कार्यशील व्हायचं हेच अंतिम ध्येय ठेवल्याने त्या पद्धतीनेच त्यांनी पावलं टाकायला सुरुवात केली.हीच ओळख त्याच्या राजकीय प्रवासाची नांदी ठरली. सामाजिक कामातून राजकारणात सक्रिय होणाऱ्या तरुणांमधील महादेव कोगनुरे हे महत्त्वाचं नाव आहे. आगामी काळात दक्षिण सोलापूरचा जन-नायक म्हणून त्याची ओळख निर्माण होईलच, यासाठी त्यांना शुभेच्छा देऊया...!
------------------------------------
▪️जनता संघर्ष न्यूज ▪️संपादक-सिध्दार्थ भडकुंबे
▪️बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०


Comments

Popular posts from this blog

इफ्तार पार्टी म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक' इफ्तार पार्टीत घडले एकात्मतेचे प्रतीक मराठा सेवा संघाचा पुढाकार.

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी सलगर शाळेत नवागतांचा प्रवेशोत्सव संपन्न...

सोलापूर महानगरपालिकेचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. वाय. एच. पलोलू यांना पुन्हा म.न.पा सेवेत फेर नियुक्ती देण्याकरिता सोलापूरचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांना निवेदन सादर