जनता संघर्ष न्यूजच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्यांचा सन्मान.

जनता संघर्ष न्यूजच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्यांचा सन्मान. सोलापूर -प्रतिनिधी अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या जनता संघर्ष न्यूजचा द्वितीय वर्धापन दिन कार्यक्रम दि.२६ मे २०२४ रोजी समाज कल्याण केंद्र रंगभवन या ठिकाणी मोठ्या थाटात संपन्न झाला.दरम्यान विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या गुणीजनांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून जेष्ठ साहित्यिका प्रा.नसीमा पठाण,कवयित्री तथा निवेदिका प्रांजली मोहिकर,सुवर्णराज महिला मंडळाच्या अध्यक्षा सुवर्णा झाडे-खेलबुडे,सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक अनिल उकरंडे,शाहीर रमेश खाडे, तंटामुक्त अध्यक्ष सुरेश(आण्णा) डवले आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर,महात्मा ज्योतिबा फुले व राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुष्पअर्पण करून पूजन करण्यात आले.तदनंतर प्रमुख पाहुण्यांचा शाल,गुलाब पुष्प व रोपटे देऊन श्री.व सौ.आशा सिद्धार्थ भडकुंबे यांनी सत्कार केला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सिद्धार्थ भडकुंबे यांनी केले. यावेळी व...