ग्रामपंचायत गोगांव येथे महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती साजरी.
ग्रामपंचायत गोगांव येथे महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती साजरी.
प्रतिनिधी-अक्कलकोट
लिंगायत समाजाचे धर्मगुरू वीरशैव जगतज्योती संत बसवेश्वर महाराज यांचा जन्म कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील इंगळेश्वर-बागेवाडी या गावात ११०५ साली वीरशैव कुटूंबात बसवेश्वरांचा जन्म झाला.सामान्यतः त्यांचा जन्म वैशाख शुद्ध तृतीया अर्थात अक्षय तृतीयेला झाल्याचे मानले जाते.म्हणून ह्या दिवशी लिंगायत समाज महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी करतात.दरम्यान अक्कलकोट तालुक्यातील ग्रामपंचायत गोगांव येथे महात्मा बसवेश्वर महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी कार्यक्रम अध्यक्षस्थानी उपसरपंच कमलाकर सोनकांबळे हे होते.प्रतिमा पूजन डॉ.लिंगराज नडगेरी यांनी केले.यावेळी आरोग्य सेविका अंबिका वळसंग,पोलीस पाटील चंद्रकला गायकवाड, अंगणवाडी सेविका तेजाबाई गुरव,भाग्यश्री सोनकवडे शिपुत्र कलशेट्टी आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240