गुणवंत विद्यार्थिनी कु.साक्षी पवार हिचा वटवृक्ष मंदिरात सन्मान

गुणवंत विद्यार्थिनी कु.साक्षी पवार हिचा वटवृक्ष मंदिरात सन्मान
श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिर कार्यालयात कु.साक्षी पवार हिचा सत्कार करताना विश्वस्त संपतराव शिंदे महेश गोगी, आत्माराम घाटगे व अन्य दिसत आहेत.


प्रतिनिधी अक्कलकोट
सी.बी.खेडगी महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु.साक्षी पवार हिने बारावीच्या परीक्षेत वाणिज्य शाखेतून ८९.१७% गुण मिळवून खेडगी महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तिच्या या यशाबद्दल श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान विश्वस्त समितीच्या वतीने कु.साक्षी पवार हिचा स्वामींचे कृपावस्त्र, प्रसाद, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या अधिपत्याखाली विश्वस्त तथा करमाळा पंचायत समितीचे माजी सभापती संपतराव शिंदे यांनी कु.साक्षी पवार हिचा सन्मान केला. याप्रसंगी बोलताना मंदिर समितीचे विश्वस्त महेश गोगी यांनी कु.साक्षी पवार ही मुलगी देवस्थानचे माजी कर्मचारी कै.संजय पवार यांची मुलगी आहे. साक्षी पवार हिचे वडील कै.संजय पवार यांनी तहयात सेवाभावी वृत्तीने अनेक वर्ष देवस्थानचे कामकाज पाहिले आहे. साक्षी पवार हिची अभ्यासावरील निष्ठा, जिद्द, चिकाटी व तिचे वडील कै.संजय पवार यांनी केलेली मंदिरातील सेवा याचे फळ तिला या बारावीच्या निकालातून उज्वल यश संपादन करून मिळाले आहे असे मनोगत व्यक्त करून तिच्या भावी शैक्षणिक वाटचालीस व भावी जीवनास शुभेच्छा व्यक्त केल्या. याप्रसंगी मंदिर समितीचे सेक्रेटरी आत्माराम घाटगे, श्रीशैल गवंडी, मोहन शिंदे, प्रसाद सोनार, स्वामीनाथ मुमूडले आदींसह मंदिरातील सेवेकरी उपस्थित होते.
-----------------------------------------
▪️जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
▪️सिध्दार्थ भडकुंबे-संपादक
👉बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०



Comments

Popular posts from this blog

इफ्तार पार्टी म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक' इफ्तार पार्टीत घडले एकात्मतेचे प्रतीक मराठा सेवा संघाचा पुढाकार.

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी सलगर शाळेत नवागतांचा प्रवेशोत्सव संपन्न...

सोलापूर महानगरपालिकेचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. वाय. एच. पलोलू यांना पुन्हा म.न.पा सेवेत फेर नियुक्ती देण्याकरिता सोलापूरचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांना निवेदन सादर