जनता संघर्ष न्यूजच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्यांचा सन्मान.

जनता संघर्ष न्यूजच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्यांचा सन्मान.


सोलापूर -प्रतिनिधी
अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या जनता संघर्ष न्यूजचा द्वितीय वर्धापन दिन कार्यक्रम दि.२६ मे २०२४ रोजी समाज कल्याण केंद्र रंगभवन या ठिकाणी मोठ्या थाटात संपन्न झाला.दरम्यान विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या गुणीजनांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून जेष्ठ साहित्यिका प्रा.नसीमा पठाण,कवयित्री तथा निवेदिका प्रांजली मोहिकर,सुवर्णराज महिला मंडळाच्या अध्यक्षा सुवर्णा झाडे-खेलबुडे,सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक अनिल उकरंडे,शाहीर रमेश खाडे, तंटामुक्त अध्यक्ष सुरेश(आण्णा) डवले आदी उपस्थित होते.


कार्यक्रमाच्या प्रारंभी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर,महात्मा ज्योतिबा फुले व  राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुष्पअर्पण करून पूजन करण्यात आले.तदनंतर प्रमुख पाहुण्यांचा शाल,गुलाब पुष्प व रोपटे देऊन श्री.व सौ.आशा सिद्धार्थ भडकुंबे यांनी सत्कार केला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सिद्धार्थ भडकुंबे यांनी केले.
















यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या गुणीजनांचा सन्मानचिन्ह,शाल,फेटा बांधून, गुलाब पुष्प व रोपटे देऊन सत्कार करण्यात आला.
यामध्ये स्वाती विजयकुमार खरवळे(आदर्श शिक्षिका),
परमेश्वर माळगे(समाजसेवा),श्रीकांत कोळी(माहिती अधिकार कार्यकर्ता),अन्सर तांबोळी(समाजसेवा),ॲड.रविंद्र रमेश दुलंगे(विधी सेवा),सिद्धार्थ शिरसाट(चित्रकार),प्रीती विजयकुमार खरवळे (परिचारिका),विजुदा नागमोडे(समाजसेवा),विद्या माने(समाजसेवा),राम हुंडारे(पत्रकारिता)आदी पुरस्कर्त्यांचा त्यांचा समावेश होता.


याप्रसंगी शालेय विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटपही करण्यात आले.तसेच गोरगरीब,गरजू महिलांना साडया वाटप करण्यात आले.उपस्थित सर्वच प्रमुख पाहुण्यांनी मनोगत व्यक्त करत जनता संघर्ष न्यूजच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
समाजसेविका-विद्या माने

सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक- अनिल उकरंडे

जेष्ठ साहित्यिका प्रा.नसीमा पठाण

कवयित्री तथा निवेदिका प्रांजली मोहिकर

सुवर्णराज महिला मंडळाच्या अध्यक्षा सुवर्णा झाडे-खेलबुडे

              इको नेचर क्लब-मनोज देवकर

         राष्ट्ररत्न सोशल फाऊंडेशन-प्रा.ज्योतीताई मेने



शाहीर-रमेश खाडे


याप्रसंगी राष्ट्ररत्न फाउंडेशनचे ज्योती मेने,प्रेमचंद मेने,इको नेचर क्लबचे मनोज देवकर,संगप्पा कांबळे,महेश दावणे,अक्षय बबलाद,सिताराम गायकवाड लक्ष्मी लोंढे,इम्तियाज अक्कलकोटकर दैनिक शिवनिर्णयचे संपादक अनिल शिराळकर,नदंर्गी सर, नितीन करजोळे आशिष भूदत्त राजेंद्र स्वामी ,उपेंद्र गायकवाड,काशिनाथ भदगुणगी,आरती ननवरे,साप्ता कायद्याचा दणका संपादक नितीन कांबळे,मारुती सुतार,कट्टीमनी सर आदी उपस्थित होते.




कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास भोसले यांनी केले तर आभार सिद्धार्थ भडकुंबे यांनी मानले.
-----------------------------------------
▪️जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
▪️सिध्दार्थ भडकुंबे-संपादक
👉बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०

Comments

Popular posts from this blog

इफ्तार पार्टी म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक' इफ्तार पार्टीत घडले एकात्मतेचे प्रतीक मराठा सेवा संघाचा पुढाकार.

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी सलगर शाळेत नवागतांचा प्रवेशोत्सव संपन्न...

सोलापूर महानगरपालिकेचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. वाय. एच. पलोलू यांना पुन्हा म.न.पा सेवेत फेर नियुक्ती देण्याकरिता सोलापूरचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांना निवेदन सादर