बाल श्रामनेर शिबिर उत्साहात संपन्न.
बाल श्रामनेर शिबिर उत्साहात संपन्न.
प्रतिनिधी-सोलापूर
भारतीय बौद्ध महासभा सोलापूर जिल्हा शाखा आयोजित बाल श्रामणेर शिबिर सांगता समारंभ कार्यक्रम मोठ्या उत्साहात आनंदात संपन्न झाला.ममता सागर महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्या ८९व्या वाढदिवसा निमित्त दि.८/५/२०२४ ते दि.१२/५/२०२४ पर्यंत श्रामणेर शिबिर शिक्षक हाउसिंग सोसायटी वेळुवन बुद्ध विहार येथे सुरू होते.या शिबिराचा सांगता समारंभ कार्यक्रम दि.१२/५/२०२४ रोजी सायंकाळी ७ वाजता संपन्न झाला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अण्णासाहेब वाघमारे होते तर सूत्रसंचालन जिल्हा सरचिटणीस नागसेन माने व विशाल ढेपे यांनी केले.
या समारोप कार्यक्रमास पुज्य भन्ते बी सारीपुत्र,निधी बँकेचे सर्वेसर्वा आदरणीय डॉ.अरुण कुमार इंगळे सोलापुरातील नामवंत डॉ.सुरेशजी कोरे सर वेळुवन बुद्ध विहार चे व्यवस्थापक प्रदीप ताकपेरे सर,आयुष्यमान सुनील डांगे सर व महिला विभागाच्या महाराष्ट्र राज्य विभागीय संघटक शारदाताई गजभिये,महिला विभागाच्या जिल्हाध्यक्ष निर्मलाताई कांबळे,जिल्हा सरचिटणीस नंदाताई काटे,आशाताई शिवशरण,मंगल ताई सूर्यवंशी,बाबुराव रणखांबे, बुद्धरत्न लंकेश्वर राजेंद्र माने उपाध्यक्ष श्याम शिंगे सर अंगद मुके सर,शहराचे अध्यक्ष विशाल गायकवाड सुमित डोलारे रमाताई ढावरे वैशालीताई उबाळे दीपक आठवले,संजय दुपारगुडे, बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे सर्व आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी व बौद्ध महासभेच्या दान दांत्यानी समता सैनिक दलाचे सैनिक श्रद्धावान शील संपन्न उपासक उपासिका व ज्याने आपली मुलं पाच दिवसासाठी शिबिरास पाठवलेल्या आहेत आशा माता पित्यांचीही उपस्थित होती. या बाल श्रामनेर शिबिरात एकूण ३२ विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता.
त्यांच्या मनावर चांगले संस्कार व्हावे देशसेवा वाढीस लागावी व नैतिकतेचे जीवन त्यांनी जगाव याच्यासाठी हे संस्कार देण्याचे शिबिर आयोजित करण्यात आले होते.या शिबिरास भन्ते सारीपुत्त थेरो,धम्मरक्षिता कांबळे, शारदा गजभिये, नागसेन माने,मिनाक्षी बनसोडे, निर्मला कांबळे, आशाताई शिवशरण, नंदाताई काटे, धम्मपाल माने,मंगल सुर्यवंशी,आदीनी प्रशिक्षण दिले.अत्यंत उस्फूर्त प्रतिसाद या शिबिरास शहरातुन तेथील रहिवाशांकडून मिळाला आहे. मनुष्याला सुखी होण्यासाठी संस्काराची ही गरज ज्याप्रमाणे अन्न वस्त्र निवारा आवश्यक आहे. त्याप्रमाणे नैतिकतेचे संस्कार आपण आपल्या मुलावर ती लहानपणापासून केले तर आपले मुलं चांगल्या प्रकारे आपले जीवन जगतील आसे शिबीर वारंवार घ्यावी असे प्रतिपादन डॉ.अरुण कुमार इंगळे यांनी केले.
Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240