महादेव कोगनुरे पोहचले शेतकर्यांच्या बांधावर/पीक नुकसानी बरोबर पडझड घरांची केली पाहणी.

महादेव कोगनुरे पोहचले शेतकर्यांच्या बांधावर/पीक नुकसानी बरोबर पडझड घरांची केली पाहणी.
पीक नुकसानीची पाहणी करताना एम के फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे व त्यांचे कार्यकर्ते.


प्रतिनिधी-द. सोलापूर
 दक्षिण सोलापूर तालुक्यात गेल्या दोन दिवसांपूर्वी अवकाळी पावसाच्या तडाख्यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.यासाठी एम के फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष तथा सागर सिमेंट चे मुख्य व्यवस्थापक महादेव कोगनुरे यांनी तालुक्यातील अनेक गावांना भेट देत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पीक नुकसानीची पाहणी केली.यावेळी शेतकर्यांशी बोलताना महादेव कोगनुरे म्हणाले की, प्रशासनाच्या दरबारी शेतकर्यांची व्यथा मांडून बाधित पिकांची तातडीने पंचनामे करुन शेतकर्यांना त्वरित भरपाई मिळवून देण्यासाठी  प्रयत्न करणार असल्याचे सांगत शेतकर्यांना धीर दिला.

मागच्या आठवड्यात दक्षिण सोलापूर तालुक्याच्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाच्या तडाख्यात शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे..उन्हाळी गहू, भुइमूग, कांदा, भाजीपाला,मका पिकांसह फळपिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.त्यासाठीच महादेव कोगनुरे यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील अनेक गावांना तसेच हद्दवाढ भागातील घरांना भेट देत नुकसानीची पाहणी केली. 



यावेळी एक के फाउंडेशन चे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.महादेव कोगनुरे यांनी केलेल्या पाहणीत आंब्याची झाडे, लिंबूच्या बागा, उन्हाळी भुईमूग, कांदा तसेच हद्दवाढ भागातील घरावरील उडालेले पत्रे,घरांची झालेली पडझड आदी विविध पिकांचे व अनेक घरांचे नुकसान झाल्याचे दिसून आले.त्यासाठी त्वरित पीक नुकसानीचे व पडझड घरांची काटेकोर पंचनामे करण्याची मागणी ही यावेळी महादेव कोगनुरे यांनी प्रशासनाकडे केली.तसेच महादेव कोगनुरे यांनी बाधित शेतकऱ्यांशी  संवाद साधत शेतकर्यांना धीर दिला.
-----------------------------------------
▪️जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
▪️सिध्दार्थ भडकुंबे-संपादक
👉बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०



Comments

Popular posts from this blog

इफ्तार पार्टी म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक' इफ्तार पार्टीत घडले एकात्मतेचे प्रतीक मराठा सेवा संघाचा पुढाकार.

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी सलगर शाळेत नवागतांचा प्रवेशोत्सव संपन्न...

सोलापूर महानगरपालिकेचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. वाय. एच. पलोलू यांना पुन्हा म.न.पा सेवेत फेर नियुक्ती देण्याकरिता सोलापूरचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांना निवेदन सादर