श्री वटवृक्ष देवस्थानच्या वतीने स्वामींचा पालखी सोहळा संपन्न.

श्री वटवृक्ष देवस्थानच्या वतीने स्वामींचा पालखी सोहळा संपन्न.
पालखी मिरवणूक प्रस्थानप्रसंगी महेश इंगळे, मंदार महाराज पुजारी, अमोलराजे भोसले, व इतर दिसत आहेत.


प्रतिनिधी/अक्कलकोट
           दत्त अवतारी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या १४६ व्या पुण्यतिथी निमित्त पालखी सोहळा मिरवणूक मोठ्या उत्साहाने व भक्तिभावाने संपन्न झाला. 
       तीर्थक्षेत्र अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने सायंकाळी साडे पाच वाजता मंदिरातून पालखी मिरवणुकीस मोठ्या भक्तीभावाने व अपार श्रद्धेने प्रारंभ झाला. प्रारंभी देवस्थानचे पुरोहित मंदार महाराज पुजारी यांचे हस्ते श्रींची आरती झाली. यानंतर  वटवृक्ष मंदिर समितीचे चेअरमन व मा. नगराध्यक्ष तथा नगरसेवक महेश इंगळे यांच्या हस्ते व श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत पालखी पूजन होऊन पालखी मिरवणूक प्रस्थान झाले. पालखी सोहळ्यामध्ये टाळ मृदूंगाचा गजर, सुश्राव्य बँड पथक, दिंडी, व स्वामी नामाचा गजर, तसेच ढाकणी, चिकुर्डा, वडगांव, खामसवाडी, उदतपूर, तावशी येथून आलेल्या वारकरी दिंडया यामुळे पालखी सोहळा रंगला होता. याच बरोबर स्वामी नामाच्या जय जयकाराने सर्व आसमंत दुमदुमून गेला होता. मुंबई येथील स्वामी भक्त परिवाराच्या वतीने मंदिरातील गाभाऱ्यास नयनरम्य अशी आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. 
       पालखी सोहळ्याचे चौकाचौकात भाविकांनी रांगोळी व गुलाबपुष्पांच्या उधळणासह स्वागत करून दर्शन घेतले. फत्तेसिंह चौक, समर्थ चौक, सावरकर चौक, कारंजा चौक मार्गे समाधी मठाकडे पालखी सोहळ्याचे प्रस्थान झाले. समाधी मठात पालखीचे पूजन, भजन होऊन कारंजा चौकमार्गे सुभाष गल्ली, भारत गल्ली, देशमुख गल्ली मार्गे वटवृक्ष मंदिरात पालखी विसावली. वटवृक्ष मंदिरात भजन, विडा, चौरी, आरती होऊन शिरा प्रसाद वाटपाने पालखी सोहळ्याची सांगता झाली. स्वामी पुण्यतिथी निमित्त आ.सचिन कल्याणशेट्टी, मा.आमदार सिद्धाराम म्हेत्रे, अमोलराजे भोसले, बसलिंगप्पा खेडगी, महेश हिंडोळे, आदी मान्यवरांनी श्रींचे दर्शन घेतले. श्री. स्वामी समर्थांच्या या पुण्यतिथी निमित्त महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून स्वामीभक्त अक्कलकोट नगरीत दाखल झाले होते. यावेळी देवस्थानचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, उज्वलाताई सरदेशमुख, प्रथमेश इंगळे, संपतराव शिंदे, दयानंद हिरेमठ, प्रदीप झपके, विजय दास, प्रसन्न हत्ते, नागनाथ जेऊरे, प्रमोद हिंडोळे, राजेश नीलवणी, व्यंकट मोरे, अमर पाटील, डॉ.मनोहर मोरे, रामचंद्र समाणे, शिवानंद स्वामी, प्रदीप हिंडोळे, राजेंद्र हत्ते, प्रसाद काळे, पिंटू साठे, चंद्रकांत सोनटक्के, दीपक जरीपटके, शिवशरण अचलेर, अविनाश क्षीरसागर, सागर गोंडाळ, संजय पाठक, गिरीश पवार, शशिकांत लिंबीतोटे, अजिंक्य डांगे, चंद्रकांत डांगे, श्रीनाथ महानुरे, अक्षय सरदेशमुख, काशिनाथ गुरव, ज्ञानेश्वर भोसले, संतोष जमगे, मंगेश फुटाणे, स्वामीनाथ लोणारी, संतोष पराणे, संजय पवार, प्रसाद सोनार, भीमा मिनगले, मोहन जाधव, राजू नवले, नितीन शिंदे, गणेश दिवाणजी, शरणप्पा लिंबीतोटे, किरण किरात, योगेश पवार, रवी मलवे, महेश मस्कले, चंद्रकांत गवंडी, गोकुळ गवंडी, सुनील गवंडी, लक्ष्मण घंटे, स्वामीराव मोरे, अशोक घंटे, विजयकुमार कडगंची,प्रविण घाटगे, मनोज इंगुले, अमर पाटील,
संजय बडवे, निखील पाटील, विश्वास शिंदे, श्रीकांत मलवे, नरसिंग क्षीरसागर, मोहन जाधव, स्वामीनाथ लोणारी, ऋषिकेश लोणारी, संजय पवार, मोहन शिंदे, स्वामीनाथ मुमूडले, ज्ञानेश्वर भोसले, मल्लिनाथ बोधले, मेघना शहा, अपर्णा राशीनकर, ज्योती जरीपटके, सुवर्णा जाधव, मंगल फडतरे, कौशल्या जाजू, हिंडोळे ताई, इत्यादींसह देवस्थानचे व अन्नछत्र मंडळाचे कर्मचारी व सेवेकरी उपस्थित होते.
-----------------------------------------
▪️जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
▪️सिध्दार्थ भडकुंबे-संपादक
👉बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०





        

Comments

Popular posts from this blog

इफ्तार पार्टी म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक' इफ्तार पार्टीत घडले एकात्मतेचे प्रतीक मराठा सेवा संघाचा पुढाकार.

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी सलगर शाळेत नवागतांचा प्रवेशोत्सव संपन्न...

सोलापूर महानगरपालिकेचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. वाय. एच. पलोलू यांना पुन्हा म.न.पा सेवेत फेर नियुक्ती देण्याकरिता सोलापूरचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांना निवेदन सादर