धर्मसंकीर्तन महोत्सवात शास्त्रीय भक्तीसंगीत संपन्न. पुण्यातील गायिका माधुरी करंबेळकर, डॉ.राजश्री महाजनी यांच्या शास्त्रीय गायन सेवेत भाविक श्रोते मंत्रमुग्ध.

धर्मसंकीर्तन महोत्सवात शास्त्रीय भक्तीसंगीत संपन्न. पुण्यातील गायिका माधुरी करंबेळकर, डॉ.राजश्री महाजनी यांच्या शास्त्रीय गायन सेवेत भाविक श्रोते मंत्रमुग्ध. धर्मसंकीर्तन सोहळ्यात व्यासपीठावर पुण्यातील गायिका माधुरी करंबेळकर, डॉ.राजश्री महाजनी, सहगायक तुषार केळकर यांनी गायनसेवा सादर करताना दिसत आहेत. प्रतिनिधी-अक्कलकोट श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात श्री स्वामी समर्थांच्या १४६ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या धर्मसंकीर्तन सोहळ्यातील आजचे सहावे पुष्प पुण्यातील स्वामीभक्त गायिका माधुरी करंबेळकर, डॉ.राजश्री महाजनी, सहगायक तुषार केळकर यांच्या शास्त्रीय गायन व भक्ती संगीत गायन सेवा सादरीकरणाने गुंफले गेले. कार्यक्रमाच्या प्रारंभी सर्व मान्यवर कलाकारांचा मंदिर समितीच्या वतीने समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, प्रथमेश इंगळे यांनी स्वामींचे कृपावस्त्र, प्रसाद देऊन सत्कार केला. या शास्त्रीय गायन सेवेत व भक्ती संगीत सेवेत गायिका माधुरी करंबेळकर, डॉ.राजश्री महाजनी, सहगायक तुषार केळकर आदींनी सुरुवातीला राग हंसध्वनी, वातापी गणपती, स्वामी समर्...