ह.भ.प.भारत महाराज कुलकर्णी यांच्या प्रवचनाने श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरातील धर्म संकीर्तन महोत्सवास सुरुवात.

ह.भ.प.भारत महाराज कुलकर्णी यांच्या प्रवचनाने श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरातील धर्म संकीर्तन महोत्सवास सुरुवात.
प्रवचन सेवा सादर करताना ह.भ.प.भारत महाराज कुलकर्णी दिसत आहेत.


प्रतिनिधी-अक्कलकोट
कोणत्याही क्षेत्रात कार्य करीत असताना ते कार्य धर्मनितीची कास व सेवेला धरुन असलं पाहिजे त्यातून एक आदर्श वस्तुपाठ निर्माण होतो आणि त्यातुन धर्मनितीचा प्रसार होतो असे निरूपण वैरागचे ह.भ.प.भारत महाराज कुलकर्णी (साकतकर) यांनी केले. ते येथील श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान आयोजीत
श्री स्वामी समर्थ महाराजांच्या १४६ व्या पुण्यतिथी महोत्सवातील प्रथम पुष्प श्री चरणी अर्पण करताना बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळेंच्या मार्गदर्शनाखाली मंदिर समितीचे सेक्रेटरी आत्माराम घाटगे, प्रथमेश इंगळे यांनी भारत महाराज कुलकर्णी यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला.पुढे बोलताना ह.भ.प. कुलकर्णी महाराज यांनी जिज्ञासु व मुमुक्षाचे आश्रयस्थान म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज आहेत. मानव वंशाच्या कल्याणासाठीच स्वामी समर्थांनी आपल्या अवतार कार्याची निर्मिती केलेली आहे. श्री स्वामी समर्थ विश्वाचे गुरु आहेत आणि मानव जन्माच्या या भवसागरातून तरुन जाण्यासाठी स्वामी समर्थरुपी गुरूंना भाविकांनी नेहमीच शरण जावे असेही प्रतिपादन केले. यावेळी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, संपतराव शिंदे, उज्वलाताई सरदेशमुख, दयानंद हिरेमठ, शंकरराव पवार, विजयकुमार कडगंची, दीपक जरीपटके, शिवशरण अचलेर, सागर गोंडाळ, संजय पाठक, ऋषिकेश लोणारी, स्वामीनाथ लोणारी, अविनाश क्षीरसागर, मोहन जाधव, स्वामीनाथ माळी, ज्ञानेश्वर भोसले,संतोष जमगे, प्रसाद पाटील, स्वामीनाथ मुमूडले आदींसह बहुसंख्य स्वामीभक्त उपस्थित होते. 
-----------------------------------------
▪️जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
▪️सिध्दार्थ भडकुंबे(संपादक)
▪️बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०

Comments

Popular posts from this blog

इफ्तार पार्टी म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक' इफ्तार पार्टीत घडले एकात्मतेचे प्रतीक मराठा सेवा संघाचा पुढाकार.

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी सलगर शाळेत नवागतांचा प्रवेशोत्सव संपन्न...

सोलापूर महानगरपालिकेचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. वाय. एच. पलोलू यांना पुन्हा म.न.पा सेवेत फेर नियुक्ती देण्याकरिता सोलापूरचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांना निवेदन सादर