श्री.वटवृक्ष मंदिरात श्री.गुरुलिलामृत पोथी पारायण सेवेस प्रारंभ.

श्री.वटवृक्ष मंदिरात श्री.गुरुलिलामृत पोथी पारायण सेवेस प्रारंभ.
पारायण सोहळ्यात श्री गुरु लीलामृत पोथी वाचन करताना उज्वलाताई सरदेशमुख व पारायणकर्ते भक्त दिसत आहेत.



प्रतिनिधी-अक्कलकोट
श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात श्री स्वामी समर्थांच्या १४६ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त समितीचे विश्वस्ता उज्वलाताई सरदेशमुख यांच्या अधिपत्याखाली व मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सचिव आत्माराम घाटगे यांच्या उपस्तिथीत मोठ्या भक्तीमय वातावरणात श्री.गुरुलीलामृत या पोथीच्या सामुदायिक पारायण सेवेस नुकतेच देवस्थानच्या ज्योतिबा मंडपात प्रारंभ झाले. सदर पारायण सेवा आज दिनांक २५ एप्रिल २०२४ ते दिनांक ०५ मे २०२४ अखेर सकाळी ८ ते ११:३० या वेळेत आयोजित करण्यात आले आहे. या पारायण सोहळ्यात २६४ भाविकांनी सहभाग नोंदविले असल्याची माहिती सेक्रेटरी आत्माराम घाटगे यांनी दिली. महिला भाविकांची या सोहळ्यात अग्रक्रमाने उपस्थिती आहे. या प्रसंगी बोलताना विश्वस्त महेश गोगी यांनी श्री स्वामी समर्थांच्या पुण्यतिथी महोत्सवात पारायण सोहळ्यात श्री गुरुलीलामृत ग्रंथाचे पोथी वाचन म्हणजे पारायणकर्ते भाविकांना स्वामी भक्तीची व सेवेची मिळालेली सुवर्ण संधी असून सालाबादानुसार परंपरेप्रमाणे याही वर्षी देवस्थानने ही पारायण सेवेची संधी भक्तांना उपलब्ध करून दिली आहे. आजपर्यंत अनेक पुरुष व महिला भक्तांनी पारायण केल्याने विविध अनुशंगाने स्वामींची प्रचिती येऊन जीवनातील विविध संकट तारून जीवन कृतार्थ झाले असल्याचे अनेक भक्तांचे मानणे आहे. भविष्यातही जास्तीत जास्त स्वामी भक्तांनी या पारायण सोहळ्यात सहभागी होऊन स्वामींचे आशीर्वाद आपल्या पाठीशी घ्यावे अशी भावना व्यक्त केली. या प्रसंगी देवस्थानचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, संपतराव शिंदे, दयानंद हिरेमठ, श्रीपाद सरदेशमुख, गिरीश पवार, अविनाश क्षीरसागर, महेश मस्कले, श्रीशैल गवंडी, संजय पवार, संतोष जमगे, अक्षय सरदेशमुख, सिद्धाराम कुंभार, महेश काटकर, प्रसाद सोनार, बापू घोसले, शिवशरण अचलेर, दिपक जरीपटके, अमर पाटील आदींसह भाविक भक्त उपस्थित होते.
-----------------------------------------
▪️जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
▪️सिध्दार्थ भडकुंबे-संपादक
👉बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४९



Comments

Popular posts from this blog

इफ्तार पार्टी म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक' इफ्तार पार्टीत घडले एकात्मतेचे प्रतीक मराठा सेवा संघाचा पुढाकार.

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी सलगर शाळेत नवागतांचा प्रवेशोत्सव संपन्न...

सोलापूर महानगरपालिकेचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. वाय. एच. पलोलू यांना पुन्हा म.न.पा सेवेत फेर नियुक्ती देण्याकरिता सोलापूरचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांना निवेदन सादर