जागतिक वसुंधरा दिनी वृक्षारोपण; वृक्षारोपणाला पावसाने लावली हजेरी.

प्रतिनिधी-सोलापूर
जागतिक वसुंधरा या दिनाचे महत्त्व व आपल्या पर्यावरण संवर्धन,जलसंवर्धन,प्लास्टिक प्रदूषण स्वच्छता यासाठी उपाय योजना वेगवेगळे उपक्रम माझी वसुंधरा अभियान जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, इको नेचर क्लब व सर्व पर्यावरण संस्था पर्यावरण प्रेमी सर्व वसुंधरा मित्र उपक्रम हाती घेत आहेत.१६ तारखेला जल संवर्धन संवाद यात्रा काढण्यात आली.त्यानंतर प्लास्टिक पिशव्यांचा वापर कमी व्हावा म्हणून सोलापूर महानगरपालिका वसुंधरा अभियानाच्या माध्यमातून कापडी पिशव्यांचा वापर व्हावा म्हणून कापडी पिशव्या वाटप करण्यात आले.इको नेचर क्लबच्या माध्यमातून रोपवाटपही करण्यात आले.दि.२२ एप्रिल,२०२४रोजी समाज कल्याण विभाग अंतर्गत डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुलांचे वसतीगृह अशोक नगर परिसर समोरील महानगरपालिका हद्दीतील परिसरात वृक्ष लागवड करण्यात आले.जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सर्व पदाधिकारी अधीक्षक नदाफ सर,लोकाअभिरक्षक देवयानी कणगी तसेच सोलापूर महानगरपालिका माझी वसुंधराचे पर्यावरण अधिकारी स्वप्निल सोलंकर इको नेचर क्लबचे मुख्य प्रवर्तक डॉ.मनोज देवकर वसतीगृहाचे अधीक्षक चंद्रकांत जाधव,अर्चनाताई जगताप ओमसिंग बायस सर, सारा न्यूजचे संपादक राम हुंडारे,बीव्हीजी ग्रुपचे सर्व सदस्य,व्यवस्थापक अजय आसबे सर,इको नेचर क्लब टीम व वसतिगृहातील विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थिती ५०रोपे लावून सुरुवातीस वृक्षारोपण करण्यात आले.यामध्ये माझी वसुंधरा अभियानाचे खूप मोठे योगदान लाभले.दरम्यान विशेष जागतिक वसुंधरा दिनाबरोबर जागतिक पुस्तक दिन म्हणून विद्यार्थ्यांना पर्यावरण जनजागृती अभ्यासाविषयी पुस्तके ही वाटप करण्यात आली.
याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना डॉ.मनोज देवकर प्रतिक्रिया दिली.वसुंधरा मित्र वृक्षारोपणात निसर्गाने पावसाची उपस्थिती दर्शवली.जांभूळ ,कवट ,वड,आवळा,पिंपळ, बेल अशा प्रकारचे सर्व देशी व औषधी वनस्पतीच्या वृक्षांचे यावेळी वृक्षारोपण लावण्यात आले.लवकरच या २ एकर परिसरात हरित नंदनवन करण्याच्या एक प्रयत्न आहे.'पर्यावरण विषयक शिक्षण करेल भविष्याचे रक्षण'.

Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240